नागपुरात उघड्यावर झोपणाऱ्या बेघरांना मिळाला निवारा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

१० जानेवारी २०१९

नागपुरात उघड्यावर झोपणाऱ्या बेघरांना मिळाला निवारा

नागपूर/प्रतिनिधी:
उघड्यावर झोपणाऱ्या बेघर-निराधारांना दिला निवारा

मनपा समाज कल्याण व पोलीस विभागचा सयुक्त अभियान 

थंडीच्या दिवसांमध्ये कुडकुडत उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना मनपाच्या बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. महापालिका समाजकल्याण व सामाजिक सुरक्षा विभाग पोलिस यांच्या पुढाकाराने अशा बेघर नागरिकांना पोलीस व्ह्यांनद्वारे बेघर निवाऱ्यापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली आहे. 
थंडीमुळे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी महापालिका व सामाजिक सुरक्षा पोलिस विभाग  तर्फे संयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना पोलीस व्ह्यांन द्वारे बेघरांना बेघर निवारा केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे नागपुर शहरातील रेल्वे उड्डाणपूल, रस्ते, फुटपाथ, हॉटेल, खुले पटांगण, बसस्थानक, रेल्वेस्थानक या ठिकाणी यापुढे बेघरांना उघड्यावर राहण्याची गरज पडणार नाही. निवारागृहात् पाणी, स्वच्छतागृह, गादी, चादर,ब्लंकेट आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
 या बेघर फ्री सिटी अभियानाच्या यशस्वीतेकरीता मनपा अप्पर आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त श्रीमती रंजना लाडे व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्री संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संखे मैडम, प्रमोद खोब्रागड़े, विनय त्रिकोटवार, नूतन मोरे यांचेसह सामाजिक सुरक्षा पोलिस पोलीस विभाग, मनपा समाज कल्याण विभाग तसेच स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी मेहनत घेत आहे.