व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून 2 लाख लुटले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून 2 लाख लुटले

  • गंगाखेडचे प्रसिध्द व्यापारी निलेश फरकंडकर त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून चोरट्यांनी लुटले दोन लाख रुपये
  • संतोष मुरकुटे मित्र मंडळाने माणुस धर्म पाळला

गोविंद मठपती/परभणी 

 दि. 21 रोजी गंगाखेडचे प्रसिध्द व्यापारी निलेश फरकंडकर हे त्यांच्या व्यापारा निमित्त सकाळी 11-30 या दरम्यान नांदेड येथे आपल्या मोटर सायकलवर ऐकटे जात असताना पालम - लोहा सिमेवर त्यांच्यावर लक्ष ठेऊन असणार्‍या चोरट्यानी त्यांच्या डोळ्यात, तोंडात मिरची पावडर टाकली व रोख दोन लाख लुटले या वेळी निलेश यांना गंभीर मारहाण करण्यात आली. त्यांना खुप असाह्य अशा वेदना होत होत्या. त्यांना काही दिसत नव्हते. काही सुचत नव्हते. त्याच वेळेस गंगाखेड येथून संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळाचे अमोल दिवाण, दिपक मुरकुटे, अशोकराव मुरकुटे, सुधाकरदादा येवले हे लग्न सोहळ्या निमित्त लोहा येथे जात असताना सदर घटना त्यांच्या निर्दशनात आली. नंतर सर्वानी मिळुन निलेश यांना आपल्या गाडीत लोहा येथील  डाॅ.कानवटे यांच्या कडे पुढील उपचारासाठी तातडीने नेऊन लोहा पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती दिली. व तेथे लोहा पोलीस प्रशासनातील पोलीस दाखल झाले. प्रथमउपचारा नंतर त्यांना नांदेड येथे डोळ्याच्या दवाखान्यात हलवण्यात आले. वरिल सर्वांनी मदत केली. व हे करुन खर्‍यार्थाचा माणुस धर्म पाळला.