महावितरणे बदलले 35 हजारावर नादुरुस्त वीज मीटर्स - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

महावितरणे बदलले 35 हजारावर नादुरुस्त वीज मीटर्स

अचूक वीजबिल आणि योग्य महसुलासाठी महावितरण आग्रही
नागपूर/प्रतिनिधी:

वीज मीटर हा महावितरणसाठी जिव्हाळ्याचा विषय असून या आधारेच महावितरणची एकूणच आर्थिक वाटचाल अवलंबून असते. नादुरुस्त वीज मीटरमुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा मनस्ताप सहन करावा लागतो. सोबतच महावितरणच्या महसुलाचे सुद्धा नुकसान होत असते. हे हेरुन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात नादुरुस्त वीज मीटर बदलण्यास प्राधान्य देत वर्ष 2018-19 मध्ये आतापर्यंत तब्बल 35 हजार 161 नादुरुस्त मीटर्स बदलण्यात आले आहे. हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाइल अॅतपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंदही करण्यात आली आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे क्षेत्रिय मुख्य अभियंत्यांसमवेतच्या बैठकांप्रसंगी नादुरुस्त वीज मीटर बदलण्याबाबत सदैव आग्रही राहीले आहेत. 1 एप्रिल 2018 पासून आतापर्यंत नागपूर परिमंडलात येणाऱ्या वर्धा जिल्ह्यात 2 हजार 211 तर नागपूर शहर आणि ग्रामीण मंडळ कार्यालय अंतर्गत 4 हजार 404 वीज मीटर्स बदलण्यात आली आहेत. महावितरणची वितरण फ़्रॅन्चाइझी असलेल्या मे. एसएनडीएल यांनीही याकाळात 728 नादुरुस्त वीज मीटर्स बदलली आहेत. याशिवाय अकोला मंडलात 2992, बुलढाणा मंडलात 3178, वाशिम मंडलात 1288, अमरावती मंडलात 4958, यवतमाळ मंडलात 3103, चंद्रपूर मंडलात 3746, गडचिरोली मंडलात 3576, भंडारा मंडलात 2174, तर गोंदीया मंडलात 2803 नादुरुस्त वीज मीटरश संपुर्ण नागपूर परिक्षेत्रात एकूण 35 हजार 161 नादुरुस्त वीज मीटर्स बदलण्यात आले आहेत. बिलिंगसाठी महावितरणकडून विशेषत्वाने प्रयत्न सुरू असून नवीन वीज जोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाही याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत असून ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरीत बदलण्याची काळजी घेण्यात येत आहे.

उन्हाळ्याच्या येत्या तीन महिन्यांत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीज वापर वाढणार असल्याने या वाढलेल्या वीज वापराचे अचूक बिलिंग होऊन त्याच्या वसुलीला प्राधान्य देय़्ण्यासाठी नादुरुस्त वीजमीटर बदलण्याची मोहीम अधिक आक्रमकतेने राबविण्याचा निर्णय महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी घेतला आहे. सध्या राज्यभर पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध असून ग्राहकांना गरजेनुसार मीटर उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सांगितले. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत ग्राहकांच्या वीज वापरात वाढ होते. त्यामुळे या काळात ग्राहकांच्या वीज वापराचे अचूक रिडींग येण्यासाठी व त्यानुसार बिलींग होऊन त्याची वसुली वाढवण्यासाठी आताच नादुरुस्त वीज मीटर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर राबविण्याच्या सुचनाही त्यांनी सर्व क्षेत्रिय अभियंत्यांना दिल्या आहेत.

कार्यालय - नादुरुस्त मीटर बदली
अकोला मंडल - 2992
बुलढाणा मंडल - 3178
वाशिल मंडल - 1288
अकोला परिमंडल - 7458
अमरावती मंडल - 4958
यवतमाळ मंडल - 3103
अमरावती परिमंडल - 8061
चंद्रपूर मंडल - - 3746
गडचिरोली मंडल - 3576
चंद्रपूर परिमंडल - 7322
भंडारा मंडल - 2174
गोंदीया मंडल - 2803
गोंदीया परिमंडल - 4977
नागपूर ग्रामिण मंडल - 2558
नागपूर शहर मंडल - 1846
नागपूर शहर फ़्रॅन्चाइझी - 728
वर्धा मंडल - 2211
नागपूर परिमंडल - 7343
नागपूर परिक्षेत्र - 35161