चंद्रपूर LTV चा विद्यार्थी ३ दिवसापासून बेपत्ता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

चंद्रपूर LTV चा विद्यार्थी ३ दिवसापासून बेपत्ता

चंद्रपूर/प्रतिनिधी:


जिल्हा स्टेडियम जवळील लोकमान्य टिळक शाळेत इयत्ता दहावीत शिकत असलेला रामनगर मधिल नयन जयंत बुरडकर वय १५  वर्षे हा 18 फरवरी पासून बेपत्ता असून रामनगर पोलीस रेल्वे पोलीस आणि त्याचे नातेवाईक सर्वत्र शोध घेत आहेत.  वृत्त लिहेपरीयंत त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नव्हता, पुढील महिन्यात  इयत्ता दहावीची परीक्षा आहे. प्रात्यक्षिक परीक्षा 18 फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक शाळेत होती नेहमी प्रमाणे  शाळेला चाललो म्हणून घरून निघाला मात्र शाळेला गेला नाही. आणि प्रात्यक्षिक परीक्षाही दिली नाही. त्याचे वडील हे रेवीन्यू  कॉलनी मध्ये राहतात. सायंकाळी उशिरापर्यंत त्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरू केली त्याच्या सर्व मित्रांकडे चौकशी करण्यात आली मात्र शोध लागला नाही. त्यामुळे रामनगर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली.  त्याची सायकल चंद्रपूर येथे रेल्वेस्थानकाच्या माल धक्क्याजवळ सापडली त्यामुळे रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली त्याचा सर्वत्र शोध सुरू आहे. मात्र तो सापडलेल्या नाही परीक्षेच्या भीतीपोटीच तो घरून निघून गेला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे.