चंद्रपुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची नोंदवा 'व्हॉट्सॲप'वर तक्रार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

चंद्रपुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची नोंदवा 'व्हॉट्सॲप'वर तक्रार

चंद्रपूर पोलिस सोशल मीडियावर सक्रीय 
खबरबात/9175937925:

सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव बघता नागरिकांचे कामे व तक्रारींचा लवकरात-लवकर निपटारा व्हावा म्हणून चंद्रपूर पोलिसांनी वाहतूक नियंमांचे उल्लंघन करून वाहने चालविण्याऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी एक व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे अपघाताच्या घतना घडत असून, अशा घटनांवर आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी सोशल मीडियाची मदत घेतली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे छायाचित्र व्हॉट्सॲपवर पाठविण्याची व्यवस्था पोलीस विभागाने उपलब्ध करून दिली असून, एक व्हॉट्सॲप क्रमांक पोलीस विभागाने 
उपलब्ध करून दिला आहे.
युवकांकडून दुचाकीवर स्टंटबाजी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, जिल्ह्यातील काही जंगलमार्गावर, चंद्रपूर शहरात रामाळा तलाव मार्गावर व अन्य काही मार्गांवर युवकांकडून कार, दुचाकीवर स्टंटबाजी केली जाते. वर्षभरापूर्वी रामाळा तलाव मार्गावर कारवरून स्टंटबाजी करताना दोघांचा मृत्यू झाला होता. अन्य ठिकाणीही स्टंटबाजीकरणाऱ्या युवकांमध्ये अपघात झाले आहे. त्यामुळे स्टंटबाजी करणाऱ्या युवकांसह ट्रीपलसिट, वाहतूक कोंडी, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, अपघाताची माहिती पोलीस विभागाला तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी पोलीस विभागाने ७८८७८९१०३८ हा व्हॉट्सॲप क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून दिला आहे. 

नागरिकांना कुठेही वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे, असे आढळल्यास त्याचे छायाचित्र किंवा व्हीडिओ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिक पोलिसांच्या या व्हॉट्सॲप उपक्रमाला कसा प्रतिसाद देतात, याकडे लक्ष लागले आहे.मात्र नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांकडून कारवाई झाली का?त्यांचेवर पोलिसांनी काय  कारवाई केली?हे पोलीस विभाग तक्रारदारासमोर कश्या प्रकारे पुरावा म्हणून सादर करतील, हे मात्र पोलीस विभागाकडून सांगण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई हि त्यांच्या चंद्रपूर पोलिसांच्या पोलीस वेबसाईटच्या ट्राफिक पोलीस कॉलम मध्ये नमूद करणे गरजेचे आहे,जेणेकरून पोलीस विभागावरील नागरिकांचा विश्वास कायम राहील.ट्विटर अकाउंटची पोलिसांना गरज


तत्काळ तक्रारीचा निपटारा व्हाव्हा त्यासोबत वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेला बदल, सोबतच इतर तक्रारी तत्काळ मार्गी लागाव्यात यासाठी चंद्रपूर पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून देखील नागरिकांसोबत जुडणे गरजेचे आहेत,नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांकडून काय कारवाई केली हे देखील चलान सोबत पोलीस आपल्या ट्विटरवर खात्यावरून प्रकाशित करू शकतात, त्यासाठी चंद्रपूर पोलिसांना ट्विटरवर देखील एक्टीव असणे गरजेचे आहे.