नागपूर विमानतळावर हायअलर्ट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

नागपूर विमानतळावर हायअलर्ट


नागपूर/प्रतिनिधी:  
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.एअर इंडीयाच्या कार्यालयात फोन करत अज्ञाताने एअर इंडीयाचे विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विमातळांवरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.

एअर इंडीयाच्या कॉलसेंटरमध्ये फोन करून तुमचे विमान हायजॅक करून ते पाकिस्तानात नेऊ अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर याची माहिती गुप्तचर यंत्रणांना देण्यात आली आहे. तर देशातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच विमातळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच पार्किंगमध्ये जाणाऱ्या वाहनांची तपासणी कऱण्यात येत आहे.

ब्युरो ऑफ सिवील एविएशन सिक्यूरिटी (BCAS) कडून सर्व विमानतळांना खबरदरीचा इशारा देण्यात आला असून टर्मिनल आणि ऑपरेशन क्षेत्रात जाण्यापुर्वी कसून तपासणी करण्याचे तसेच कर्मचारी, प्रवासी, कॅटरिंग यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विमानतळावर प्रवाशांची नियमितऐवजी बॅगची कडक तपासणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळ परिसरात गस्त वाढविण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी विशेष शाखेला दिले. विशेष शाखेच्या उपायुक्त निर्मला देवी यांनी विमानतळ परिसर व मार्गावर सुरक्षा वाढवण्यासह अतिरिक्त गस्त घालण्याचे निर्देश सोनेगाव पोलिसांनी दिले. याशिवाय संशयास्पद व्यक्ती व वाहनांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.तसेच नागपुरात शिक्षण घेत असलेल्या काश्मिरी  तरुणांच्या सुरक्षेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान विशेष शाखेने सर्वच पोलिस स्टेशनला काश्मिरी तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.