💰 महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

💰 महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर


अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अंतरिम अर्थसंकल्प महाराष्ट्राचा 2019-20 वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने या काळासाठीचा सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प असणार

💫 काही महत्वाचे मुद्दे:   

▪ यंदाच्या आर्थिक वर्षात कार्यक्रम खर्चाची रक्कम 99 हजार कोटी रूपये निश्चित
▪ पंतप्रधान आवास योजनेसाठी 6895 कोटींची तरतूद
▪ पोलिसांसाठी राज्यात 1 लक्ष निवासस्थाने बांधण्याचे उद्दिष्ट, 375 कोटींची तरतूद
▪ ग्राम सडक योजनेअंतर्गत यंदा 2 हजार 164 कोटींची तरतूद
▪ ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी यंदा 6 हजार 306 कोटींची तरतूद
▪ शासनाच्या विविध विभागांशी संबंधित सेवा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी 60 कोटींची तरतूद
▪ राज्यातील किल्यांचे जतन व संवर्धन उपक्रमासाठी निधीची तरतूद, रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना, प्रत्येकी 14 किल्यांचा 2 टप्प्यात विकास
▪ राज्यातील कृषिपंप जोडणीसाठी 90 कोटी
▪ सागरमाला योजनेंतर्गत सागरी किनारपट्टीवरील बंदरांमध्ये जलवाहतूकीसाठी जेट्टी बांधण्यासाठी यंदा 26 कोटींची तरतूद
▪ ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी यंदा 6 हजार 306 कोटींची तरतूद
▪ साहित्य आणि नाट्य संमेलनांसाठीच्या अनुदानात वाढ
▪ स्मार्ट सिटी अभियानात पुणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड या 8 शहरांसाठी यंदा 2 हजार 400 कोटींची तरतूद
▪ 96 एसटी बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटी खर्चाला मान्यता

🌐www.khabarbat.com