पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज भाजप कार्यकर्त्यांशी थेट संवाद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज भाजप कार्यकर्त्यांशी थेट संवाद

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image result for मोदी मन की बात
 भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तथा विधानसभा क्षेत्रातील भाजपा तालुका पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, शहर पदाधिकारी, समाजातील बुध्दीजीवी, माजी सैनिक, वकील, डाॅक्टर, शिक्षक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दि. 28 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पक्षसंघटनात्मक बाबींवर व्हीडीओ काॅन्फरन्सींग द्वारा थेट संवाद साधणार आहेत. 

स्थानिक कन्यका परमेश्वरी सभागृह कस्तुरबा रोड, चंद्रपूर येथे होत असलेल्या या संवाद कार्यक्रमास केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर, राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्राी सुधीर मुनगंटीवार, आ. नानाजी शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे, मनपा गटनेते वसंता देशमुख, जि.प. सभापती ब्रिजभुषण पाझारे, पं.स. सभापती चंद्रपूर वंदना पिंपळशेंडे, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले, प्रभृती उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास तालुका महानगर पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी बहुसंख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा चंद्रपूर महानगर व विधानसभा क्षेत्र चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.