Notice:नागपूर शहरातील सर्व वाहन चालकांना पोलिसांच्या सूचना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

Notice:नागपूर शहरातील सर्व वाहन चालकांना पोलिसांच्या सूचना

नागपूर/प्रतिनिधी:
ओंकार नगर चौक ते मानेवाडा चौक पर्यंत (डावी बाजु) सिमेंट रस्त्याचे काम मे. आरपीएस  इन्फाप्रोजेक्टस लि. नागपूर हे 03 महिण्याचे कालावधील पुर्ण करणार आहेत. सदर मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणे करीता वाहतूकीचे नियमन करून नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याने बांधकामा दरम्यान रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी निर्माण होवू नये, तसेच रोडवर गंभीर व प्राणांतिक अपघात होवू नयेत, त्यावर प्रतिबंध व्हावा करीता ओंकार नगर चौक ते मानेवाडा चौक (डावी बाजु) या दरम्यान वाहतूकीचे दृष्टीकोनातुन दिनांक 21//02//2019 अन्वये खालील प्रमाणे अधिसुचना निर्गमित केली आहे.

Image result for नागपूर पोलीस
ओंकारनगर चौक ते मानेवाडा चौक (डावी बाजु) जाणा-या मार्गावरील सर्व प्रकारचे वाहतूकीस बंदी घालण्यात येत आहे.नमुद मार्गावरील वाहतुक ही ओंकार नगर चौक ते मानेवाडा चौक दरम्यान असलेल्या रस्ता दुभाजकाचे उजवीकडील बाजुने दुतर्फा जाईल.सदर अधिसुचना दि.20.02.2019 ते दि. 19.03.2019 पर्यंत अमंलात राहील.तरी नागपूर शहरातील सर्व वाहन चालकांनी या अधिसुचनेचे पालन करून आपली होणारी गैरसोय टाळावी व पोलीसांना सहकार्य करावे.