शिवाजी महाराजांचा लढा कोणत्याही जाती,धर्माच्या विरोधात नव्हता- प्रा.अनिल डहाके - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

शिवाजी महाराजांचा लढा कोणत्याही जाती,धर्माच्या विरोधात नव्हता- प्रा.अनिल डहाके

चंद्रपूर/प्रतिनिधी:

छ. शिवाजी महाराज धर्मसहिष्णता होते,शिवरायांचा लढा हा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हता असे प्रतिपादन शिवजयंती निमित्य (दि.20)रोजी जैतापूर येथे शिवभक्त युवा मंडळ व ग्रामवाशी द्वारा आयोजित व्याख्यानात प्रा.अनिल डहाके यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटग्रामपंचायत नांदगाव(सुर्याचा)-जैतापूर सरपंच सौ. वंदना बेरड,प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष सतीश मालेकर, ग्रा. सदस्य शंकर गोरे,पोलीस पाटील साईनाथ आत्राम, तंटामुक्त अध्यक्ष वसंत गोनेवार, संतोष धांडे, अंधश्रद्धा निर्मूलन वर प्रात्यक्षिक सादर करून दाखवणारे सोनवणे सर व कांबडे सर मंचावर उपस्थित होते.सतीश मालेकर यांनी शिवजयंती हि नाचून नाही.तर शिवचरित्र वाचून साजरी करावी असे युवकांना आपल्या मार्गदर्शनातून आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमचंद धांडे यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन चेतन चिने व आभार सतीश निब्रड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा अजय निब्रड, प्रकाश लोनगाडगे, अविनाश बेरड,बालू खुसपुरे,आशिष निब्रड, मोहन धांडे, रुपेश धांडे,अमित ताजने, योगेश निब्रड, विवेक निब्रड, मनोज धांडे, सचिन देवगडे,सुरज हनुमते, मंगेश धांडे,विकास लोनगाडगे,रोशन चिने, भोलू निब्रड,आकाश लोनगाडगे व सर्व जैतापूर ग्रामवासी यांनी सहकार्य केले.