WCL अधिकाऱ्याच्या घरून १४ लाखाचे सोने चोरीला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

WCL अधिकाऱ्याच्या घरून १४ लाखाचे सोने चोरीला

नागपूर/प्रतिनिधी:
Image result for चोर
नागपूर येथील अंबाझरी परिसरातील शिवाजी नगरातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी शंभर नव्हे दोनशे नव्हे तर तब्बल ८६० ग्राम सोन्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.या चोरीच्या घटनेने परिसरात भीती व खळबळ माजली आहे.

वेकोलिचे निवृत्त व्यवस्थापक रामलखनप्रसाद नागेश्वर प्रसाद गुप्ता (वय ६३) हे अंबाझरी परिसरातील मनुशांती अपार्टमेंटच्या सहाव्या माळ्यावर ६१६ क्रमांकाच्या सदनिकेत वास्तव्यास आहेत.२५ जानेवारीला गुप्त परिवार बिहार येथे लग्नासाठी गेले.गुरवारी जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना घराच्या दाराचे कुलूप तुटून दिसले. व सर्व साहित्य अस्तव्यस्त करून चोरट्यांनी २० सोन्याच्या नाण्यांसह ८६० ग्राम सोन्याचे दागिने, ७ महागडी घड्याळं, लॅपटॉप व ५ हजार रुपये असा एकूण १३ लाख, ६१ हजारांचा ऐवज लंपास केला.गुप्ता यांनी तत्काळ अंबाझरी पोलिसांत धाव घेतली व पोलिसांनी तत्काळ श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकांसह तापस सुरु केला.गुप्ता यांनी त्यांच्या नौकरीच्या काळात सोने खरेदी केले होते यासह त्यांची एक मुलगी बाहेर देशात असते तिचे देखील सोने त्यात असल्याचे सांगितल्या जात आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले.

त्यात चेहरे स्पष्ट दिसत असल्याने लवकरच चोरट्यांचा छडा लागण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास अंबाझरीचे सहायक पोलीस निरीक्षक फुलकवर करीत आहे.