इरा किडस् इंग्लिश मिडीयमचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

इरा किडस् इंग्लिश मिडीयमचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

राजु पिसाळ/पुसेसावळी : 

शिक्षणाबरोबर मुलांच्या अंगी असणाऱ्या इतर कलागुणांना वाव दिला तर मुले अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातही गरूड झेप घेऊ शकतात. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांनी केले.

इरा किडस् स्कूल हे आकार एज्युकेशन ट्रस्ट कराड संस्थेमार्फत चालविण्यात येते या इंग्लिश मीडियम स्कुलच वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा व बक्षीस वितरण सोहळा दत्त मंगल कार्यालय पुसेसावळी येथे संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुसेसावळी सरपंच सौ. मंगल ज्ञानदेव पवार, श्रीकांत पाटील, प्राचार्या पटेल मॅडम,आदी उपस्थित होते.
या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालचमूंनी हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. अनमोल असे हे जीवन आनंदाने व लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृती व लोकगीतांकडे दृष्टिक्षेप टाकत अस्सल मराठमोळी गीतांचा कार्यक्रम यावेळी सादर झाला. भक्तिगीत,ओवी,वासुदेव गीत, गोंधळ, शेतकरी गीत,धनगरी गीत,कोळी गीत,गवळण, वाघ्या मुरुळी, जोगवा आदी गीतांनी परिसर रंगून गेला. 
विविधरंगी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी प्रेक्षक वर्गाची मने जिंकली. मराठी संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी यातून घालून दिला.
यावेळी थोरात मॅडम, पारगावकर मॅडम, पवार मॅडम, महाडिक मॅडम, येवले मॅडम शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक वर्ग व विद्यार्थी, यांचेसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.