कारंज्यात राज्य आपत्ती दलामार्फत बचाव प्रात्यक्षिक सादर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

कारंज्यात राज्य आपत्ती दलामार्फत बचाव प्रात्यक्षिक सादर

उमेश तिवारी/कारंजा(घा)वर्धा:
शुक्रवारला स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण संस्था कारंजा द्वारा संचालित गुरूकुल पब्लिक स्कूल कारंजा येथे राज्य आपत्ती दल नागपूर (SDRF) व पथक यांच्या वतीने विद्यार्थ्यासमोर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
 दैनंदिन जीवन जगत असताना मानवी आयुष्यात ज्या नैसर्गिक आपत्ती येतात . या आपत्तीला न डगमगता मोठ्या हिमतीने तोडगा व आपत्ती वर मात  करण्याचा संदेश या पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आला. पथकाने विद्यार्थ्यां समोर अनेक आपत्ती निवारण प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रात्यक्षिकेत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.
 या पथकाद्वारे नागपूर ते मुबई सायकल रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे सदर रॅली चा पहिला पडाव हा गुरूकुल स्कूलमध्ये होता. या पथकाला पुढील प्रवासा साठी गुरूकुल परिवारा तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी माननीय श्री. रमेश बहाळे साहेब (DYSP) राज्य राखीव बल नागपूर यांनी रॅली बद्दल मार्गदर्शन केले तसेच मनोज मोहोड साहेब व पथक यांनी विद्यार्थ्यां समोर प्रात्यक्षिक सादर केले सदर कार्यक्रमास बिरजू चत्रे साहेब (PI SDRF) चांदे साहेब कारंजा, मोहन डूळे साहेब कारंजा, मनोज मोहोड साहेब, दुधे साहेब, खळतकर साहेब, कुंभारे साहेब, भूमकर साहेब, डॉ. झाडे साहेब तसेच SRPF चे पूर्ण सायकलस्वार, बँड पथक SDRF व भोकरे सर, अप्पनवार सर, बोके सर, मुख्याद्यापक निंभोरकर सर, बाळापुरे सर, बारंगे सर, सचिन सर, जसुतकर सर, सर्व  शिक्षक व इतर कर्मचारी आणि सम्पूर्ण गुरूकुल रत्न उपस्थित होते.
  सदर कार्यक्रमास SDRF व SRPF दलाने कार्यक्रमाची प्रशंसा करून शाळेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी श्री प्रदिप मयराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा पो.स्टे.चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.