पतंजलीच्या नावाने ११ लाखांचा चुना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

पतंजलीच्या नावाने ११ लाखांचा चुना

मुंबई/प्रतिनिधी: 

रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीची उत्पादनाची विक्रीसाठी एजन्सी देण्याच्या बहाण्याने एका ६६ वर्षीय वृद्धाला तब्बल ११ लाखाला गंडा घालण्याचा प्रकार मुंबईच्या दिंडोशी पोलीस स्टेशनच्या हदीत उघडकीस आला. याबाबत अझीझ हकीम बर्नी (वय ६६) यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात गंडा घालणाऱ्या दोघा जणाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
४ फेब्रुवारी २०१३ मध्ये बर्नी यांच्या ईमेलवर भामट्यांनी मेल पाठवून पतंजली कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून त्यांना औषधे व फुड कॉस्मेटिकची एजन्सी देतो, असे आमिष दाखविलेमागिल पाच वर्षापासून त्यांच्याकडून वारंवार पैस्याची मागणी केली जात होती.

 मात्र उत्पादने पुरविल्या जात नव्हते,त्यामुळे त्रासून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.यासाठी लागणारे संपूर्ण कागदपत्रे देखील पाठविण्यात आले,मात्र योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली.
.