वाडीत श्री संत गजानन महाराज प्रगट दिनोत्सव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

वाडीत श्री संत गजानन महाराज प्रगट दिनोत्सव

वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:

शंकरवाडीतील वसंतराव इखनकर भवन मध्ये श्री संत शिरोमनी गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव निमीत्य रविवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी कलश पुजन, संध्याकाळी श्री गुरुदेव सेवा मंडळ दत्तवाडी यांचे सुगम संगीत भजन ,सोमवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी महीला भजन मंडळ दत्तवाडी यांचे भजन, दुपारी ३ वाजता ह . भ .प. प्रभाकर महाराज केदार यांचे गोपाल काल्यावर हरि किर्तन , संध्याकाळी महाप्रसाद आयोजीत केला आहे . तरी भावीकांनी लाभ घेण्याचे आवाहन वसंतराव इखनकर,वर्षा इखनकर यांनी केले आहे . 

दत्तवाडीतील गजानन सोसायटी मधील श्री संत गजानन महाराज मंदीरात श्री संत गजानन महाराज प्रगट दिनोत्सव निमीत्य शनिवार २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता ह.भ.प. वसंतराव महाराज पोपटे यांचे किर्तन , रविवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री गजानन याग, सोमवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रीची पालखी , सकाळी ८ वाजता श्रीचा अभिषेक , दुपारी २ वाजता भजन, संध्याकाळी ४ वाजता ह . भ .प. शांताराम ढोले महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन , संध्याकाळी खा . कृपाल तुमाने , आ . समीर मेघे , नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन केले आहे . तरी भावीकांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत गजानन सेवा समितीचे अॅड . श्रीराम बाटवे , सुनंदा भट्टलवार , प्रा .एन.पी. पवार , व्ही.जी. मुदलिआर, मुकूंद रंगदळे, टी .बी . निघोट , राजेंद्र तिवारी, प्रशांत कोरपे , सौरभ ताले , मालती शिंदे , नंदीनी तुपकर आदींनी केले आहे .