चंद्रपुरात अज्ञात युवकाने जाळल्या ४ दुचाकी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

चंद्रपुरात अज्ञात युवकाने जाळल्या ४ दुचाकी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Four bikes and two bicycles were burnt in the night | रात्रीला चार दुचाकी व दोन सायकली जाळल्या

स्थानिक सरकार नगर स्थित हिरेंद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या मोटारसायकलला अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यामध्ये चार मोटरसायकल व दोन सायकल जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, नागरिक झोपेतून उठल्याने मोठी दुर्घटना टळली. रामनगर पोलिसांनी विणा गेडाम यांच्या तक्रारीविरुन आरोपीविरुद्ध कलम ४३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एमएच ३४ वाय ३३३, एमएच ३४ पीआय २५९५, एमएच ३४ बीसी ०९९८, एमएच ३४ झेड ११९३ व दोन सायकल जळून खाक झाल्या. सदर वाहने श्याम शील, सुरेश कटमवार, सतीश गोंधळेकर व विलास रामटेके यांच्या मालकीची होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून सायबर विभागामार्फत त्याचा तपास केला जात आहे.


बघा संपूर्ण विडीओ