ग्राहक पंचायतची चंद्रपूर जिल्हा नवीन कार्यकारिणी जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

ग्राहक पंचायतची चंद्रपूर जिल्हा नवीन कार्यकारिणी जाहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्हा ग्राहक पंचायत ची आमसभा दिनांक 24/2/2019 रोजी वरोरा येथील विनायक मंदिरात संपन्न झाली या सभेत विदर्भ प्रांत कार्यकारिणी चे सहसचिव अविनाश जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत चे जिल्हा अध्यक्ष मधुसूदन भूमकर होते .संघटनेचा  कार्यविस्तार करण्यासाठी जनतेला आपले कार्य पटवून द्यावे लागेल व ग्राहक कायद्याची माहिती आपल्या भाषेत समजावून देण्याची मोठी जबाबदारी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यकर्त्यांनी करावी ह्या विषयावर उपस्थित सगळ्यांचे एकमत झाल्यावर नवीन कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया अविनाश जोशी यांनी सुरू केली.

जिल्हाध्यक्ष पदासाठी मधुसूदन भूमकर यांचे नावावर शिक्कामोर्तब झाले .उपाध्यक्ष पदी विश्वनाथ जोशी वरोरा , वामनराव नामपल्लीवार भद्रावती , राजेश महाजन उर्जानगर ,यांची तर सचिव पदावर अँड. विनोद माढई चंद्रपूर ,सहसचिव ,अविनाश जोशी भद्रावती व विनायक माहुरे वरोरा ,यांची नियुक्ती केली गेली. एवढ्या मोठ्या जिल्ह्यात प्रथमच संघटना वाढविण्यासाठी संघटनमंत्री म्हणून विभागणी करीत  पुरुषोत्तम मत्ते भद्रावती यांचेकडे भद्रावती व वरोरा , सदाशिव सुकारे चिमूर यांचेकडे चिमूर ,नागभीड व ब्रम्हपुरी , कमलाकर सिद्धमसेट्टीवार सिंदेवाही यांचेकडे सिंदेवाही ,

दीपक देशपांडे मूल यांचेकडे , मूल,सावली ,पोंभुर्णा व गोंडपिपरी तर वसंतराव वर्हाटे भद्रावती यांचे कडे बल्लारपूर ,राजूरा व चंद्रपूर चे संघटनमंत्री म्हणून जबाबदारी दिली गेली आहे.

भद्रावती चे शेखर घुमे यांचेकडे कोषाध्यक्ष पद तर विनोद शेलोटे यांना सहकोषाध्यक्ष बनवले आहे.

सौ.नंदिनी चुनारकर ह्या महिला आघाडी प्रमुख तर भाग्यश्री भूमकर ,संगीता लोखंडे ,लिला ढवळे ,छाया वर्हाटे ,पुष्पा गोटे व आरती भोयर या महिला आघाडी सदस्य म्हणून काम करतील .

जिल्हा कार्यकारी मंडळात , गोपालकृष्ण पुराणिक, प्रा.डॉ. उत्तमराव घोसरे , गुलाबराव लोणारे ,अनिल राहुड ,अनिल कंठिवार ,केशवराव मेश्राम , विठ्ठलराव ढवळे ,शामराव  राजूरकर ,विठ्ठल अंदनकर , शशिकांत देशकर व ज्ञानेश्वर पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आली असुन प्रसिद्धी प्रमुख म्हणून संगीता लोखंडे चंद्रपूर, दीपक देशपांडे मूल व प्रशांत खुळे वरोरा दायित्व सांभाळतील असे ठरविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ही कार्यकारिणी सर्वतोपरी सहकार्य करेलच अशी अपेक्षा उपस्थित सर्व सदस्यांनी व्यक्त करीत नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे ,असे एका प्रसिद्धी पत्रकातून प्रसिद्धी प्रमुखांनी कळविले आहे.