जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत धामणखेल शाळा द्वितीय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत धामणखेल शाळा द्वितीय

   जुन्नर /आनंद कांबळे 

पुणे जिल्हा परिषदेच्या   यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात जुन्नर तालुक्यातील धामणखेल जि.प शाळेस भजन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला.


जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा अवसरी खु|| ता.आंबेगाव जि. पुणे या ठिकाणी आयोजित  करण्यात आल्या होत्या..

 भजन स्पर्धेत  लहान गटात 13 तालुक्यातील शाळा सहभागी झाल्या होत्या.. त्यामध्ये जि. प.प्राथमिक शाळा धामणखेल (,ता.जुन्नर ,जि. पुणे )या शाळेचा द्वितीय क्रमांक आला ,अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक आहिरे सर यांनी दिली.

          विजेत्या संघाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक  वळसे पाटील ,शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे, गटनेते शरद  लेंडे ,गटशिक्षणाधिकारी  पी. एस.मेमाणे,विस्तार अधिकारी भोंडवे ,केंद्रप्रमुख सौ.रंजना डुंबरे,आदी मान्य वरांच्या हस्ते चषक आणि प्रशस्ति पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

 विजेत्या संघास  पांडुरंग डामसे ,दिपक पानसरे सौ अनिता औटी ,सौ.मनीषा नाडेकर यांनी मार्गदर्शन केले.


      शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान कोंडे,उपाध्यक्ष विकास मडके,सदस्य सत्यवान ताजवे,संतोष कोंडे,चंद्रकांत कोंडे,सरपंच सौ.मंदाताई गुंजाळ उपसरपंच बारकू रघतवान व सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शाळा  व्यवस्थापन समिती सदस्य आणि धामणखेल ग्रामस्थांच्या वतीने सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन  करण्यात आले.