डॉ.संजयभाई शहा यांच्या नेतृत्वखाली ट्रस्ट गणांची बैठक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

डॉ.संजयभाई शहा यांच्या नेतृत्वखाली ट्रस्ट गणांची बैठक

बैठकीत बळसाणे ओमश्री विश्वकल्याणक तीर्थाच्या विकासाबद्दल चर्चा


खबरबात / गणेश जैन , धुळे

बळसाणे :  जगभर प्रसिद्ध असलेल्या बळसाणे गावातील ओमश्री विश्वकल्याणक जय विमलनाथ भुमी  तीर्थाच्या विकासा बद्दल नुकतीच बैठक पार पडली

  झालेल्या बैठकीत सुरत चे डॉ.संजयभाई शहा यांनी सांगितले की बळसाणे गाव हे लोकसंख्या च्या मानाने लहान असून एक धार्मिक क्षेत्र , प्रतिपंढरपूर तसेच जैन समाजाचे तीर्थक्षेत्र म्हणून अल्पवेळेतच प्रसिद्ध झाले या तीर्थापासून शहरी भाग एक तासाच्या अंतरावर आहे या तीर्थावर येणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्यात यावी व जैन साधुसंतांची सेवा जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी बाहेरील राज्यातील तीर्थक्षेत्रावर येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होवू नये असे प्रतिपादन विश्वकल्याणकाचे ट्रस्टी डॉ.संजयभाई शहा यांनी मनोगतातून केले तीर्थावर विमलनाथाच्या दर्शनार्थ राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात भाविकांना मुक्कामाकरिता शितलनाथ संस्थांना चे व पौर्णिमा बेन तसेच विश्वकल्याणकाचे भक्तिनिवास असून ही मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत असल्याने  भाविकांना उतरविण्यास खोली मिळत नसल्याने अजून विश्वकल्याणक ट्रस्ट नवीन भक्ती निवास व जैन साधुसंतांकरिता सहा उपाश्रया नियोजन केले आहे बळसाणे तीर्थावर मोठ्या प्रमाणावर जैन साधुसंत दाखल होत असल्याने त्यांची ही गैरसोय होवू नये म्हणून ट्रस्ट गण पुढील कामात लागले आहेत आणि सध्याच्या परिस्थितीत मंदिर परिसरात सीताफळ , मेहंदी , चमेली , गुलाब , नारळ , अशोका , चाफेली , आंबा  विविध प्रकारचे झाडे लावून ही दुष्काळाच्या परिस्थितीत ही रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत झाडांना पाणी घालून व त्या रोपट्यांना जगवून तेथील झाडे हिरवेगार व टवटवीत दिसून येत आहेत व काही झाडांना तर फुलांचाही बहार  आला आहे तसेच फळ बागायत ही तयार करण्यात आली आहे त्याचप्रमाणे परराज्यातील येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी बगीचा व लहान मुलांच्या मनोरंजन करिता पाळणे , घसरगुंडी , मिनी ट्रेन आदी करमणूकीचे साधन दाखल करण्यात येईल  असे विश्वकल्याणकाच्या ट्रस्ट गणांनी सांगितले  आणि महामंडळाच्या बसेसची कमतरता असल्याने बळसाणे गावी अजून कुठून आणि कोणत्या वेळेवर बळसाणे गावी बसेस पोहचल्या पाहिजे व प्रमुख मार्गावर बळसाणे गावाचे दिशाफलक नसल्याचे ट्रस्ट बाँडी या विषयावर ही चर्चा केली याबद्दल आपण संबधित विभागाला भेटून लवकरात लवकर बसेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत व प्रमुख मार्गावर दिशाफलक लावण्यात येईल तसेच

 जास्तीत जास्त विश्ववकल्याणक तीर्थाचा विकास कसा करता येईल याविषयावर ट्रस्ट गणांनी चर्चा केली यावेळी डॉ.संजयभाई शहा , कमलेश गांधी , विजय राठोड , सुमतीलाल टाटीया ,सुरेंद्र टाटीया, विजय टाटीया , महावीर कोचर, गणेश कोचर हे ट्रस्टी गण  उपस्थित होते