जन्म देण्याआधीच मुलींना संपवून नका : किरण नवले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

जन्म देण्याआधीच मुलींना संपवून नका : किरण नवले

जळगाव/प्रतिनिधी 

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला तेव्हा लखुजी राजे जाधव यांनी हत्तीवरून साखर वाटण्यात अली होती , चारशे वर्षा पूर्वी सुद्धा मुलीच्या जन्माचे स्वागत इतक्या उत्साहात ' एकविसाव्या शतकात आपण का आपल्या मुली जन्म देण्याआधीच संपवतो आहोत,  अशी खंत माळशेवगे तालुका चाळीसगाव येते आपल्या भाषणात किरणताई नवले यांनी सांगितले.

कित्तेक जिजाऊ सावित्री आपण जन्म देण्याअधिच त्यांची हत्या केली , एक हजार मुलांमागे नऊशे 45 मुली आहेत , हे माहीत असतांना सुद्धा आपण मुलीला जन्म देत नाही आहोत. स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण अधिक वाढलेले दिसत आहे , अजूनही काही ठिकाणी आदळत आहे , मुलगी झाली की त्याना आनंद झालेला नसतो.

 मुलगी आणि मुलगा समान आहेत त्यांना समान वागणूक ध्या हे आजही सांगावे लागत आहे ही   मोठी दुर्देवी बाब आहे.

आजच्या काळात मुलीचे महत्व पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे शिवमती किरण नवले यांनी दिले. किरणताई चे स्वागत हे शाळेतील मुलीच्या लेझीम पथकाने केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊं व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाली. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी गावाच्या सरपंच बेबाबाई मोरे  व प्रमुख पाहुने किरण ताई नवले होत्या. समस्त ग्रामपंचायत यांनी किरण ताई इतक्या कमी वयात गावोगावी जाऊन स्त्री भ्रूण हत्येवर प्रबोधन करत आहेत व विधवा महिला च्या सन्मान साठी काम करत आहेत त्यांच्या ह्या कामाला बघून किरणताई ना सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तर किरन ताई नवले यांच्या हस्ते गावातील आदर्श महिलांचा सत्कार करण्यात आला. आयोजन उपसरपंच व प्रदीप पाटील यांनी केले होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालीग्राम निकम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश भिकन काकलीस यांनी केले.🚩