जबरानजोत शेतकऱ्यांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

जबरानजोत शेतकऱ्यांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा

             
मूल/ प्रतिनिधी 
वनजमिनीवर वर्षानुवर्ष शेती करून कुटुंबाचा उदरभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा हक्काचे पट्टे देण्यात शासन यंत्रणेचा टोलवाटोलवी विरोधात आम आदमी पार्टी आणि मूल तालुका युवक बिरादरी संघटना यांनी संयुक्तपणे आज ता. 27 बुधवार ला येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आले.                                          स्वातंत्र्यपूर्वी पासून चंद्रपूर जिल्ह्यात तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हजारो भूमीहीन शेतकरी वनजमिनीवर शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. यातील अनेकांकडे शेती शिवाय कुटुंबाचा पालनपोषणासाठी दुसरे साधन नाही. वर्षानुवर्ष शेती करून उत्पन्न घेत असलेल्या जमिनीचे हक्काचे पट्टे मिळविण्यासाठी जबरानजोत शेतकरी मागील अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहे. परंतु कोणत्याही पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा या मागणीला गांभीर्याने घेतले नाही. शासनकर्त्याच्या शेतकऱ्यांप्रतीचा उदासीन धोरणामुळे वनजमिनीवरिल अतिक्रमणाबाबत शासन न्यायालयापुढे शेतकऱ्यांची बाजु भक्कमपणे मांडण्यात कुचराई करीत आहे. सध्याच्या शासनकर्त्यांनी जबरानजोत शेतकऱ्यांच्या हक्काची बाजु न्यायालयत व्यवस्थीत आणि भक्कमपणे मांडण्यात उदासीनता दाखविली त्यामुळेच शासनाच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने जबरानजोत शेतकऱ्यांविरोधात निकाल दिला आहे. न्यायालयाचा निर्णय आणि शासनयंत्रणेचा शेतकरी विरोधी धोरणाबाबत जाब विचारण्यासाठी मूल तालुका आम आदमी पार्टी आणि मूल तालुका युवक बिरादरी संघटना यांनी संयुक्तपणे युवक बिरादरी संघटनेचे कार्यालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य शेतकऱ्यांच्या मोर्चा काढण्यात आला. मूल तसेच लगतचा तालुक्यातील जबरानजोत शेतकरी मोठ्याप्रमाणात मोर्चात सहभागी झाले होते. तीन पिढ्याच्या पुराव्याची अट रद्द करून आदिवासींसह सर्वच जबरानजोत शेतकऱ्यांना शेतीचे पट्टे देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर विवीध मागण्याचे निवेदन मोर्चेकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना देण्यात आले. मोर्चाचे नेत्रुत्व आम आदमी पार्टीचे विदर्भप्रांत संघटक सुनील भोयर,युवक बिरादरी संघटनेचे अध्यक्ष कवडु येनप्रेड्डीवार,आम आदमी पार्टी महीला महीला आघाडी जिल्हाध्यक्ष देवकी देशकर,आम आदमी पार्टी चंद्रपूर लोकसभा उपाध्यक्ष परमजीतसिंग झगडे,आम आदमी पार्टी सोशल मीडिया प्रभारी आफताब पठाण,युथविंग जिल्हाध्यक्ष आवेश शेख, तालुका अध्यक्ष नितेश चूरे,युवक बिरादरी संघटना संघटक बंडू वानखेडे,नितेश येनप्रेड्डीवार यांनी केले.