महाराष्ट्राला 10 राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

महाराष्ट्राला 10 राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान


पुलवजा बंधारा उपक्रमामुळे महाराष्ट्राचे चित्र पालटेल
- नितीन गडकरी
नवी दिल्ली, दि. 25 : महाराष्ट्राने संपूर्ण राज्यात 170 पुलवजा बंधारे बांधण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती  घेतला असून या कामांमुळे महाराष्ट्राचे दुष्काळी चित्र पालटणार आहेअसा विश्वास केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात व्यक्त केला.
जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला पहिला राष्ट्रीय जल पुरस्कार श्री गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे जलसंपदा आणि जलसंधारण मंत्री गिरीश महाजनजलसंवर्धन  व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम  शिंदेकामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय जलसंपदानदी  विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात श्री. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमास  केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवालकेंद्रीय जलसंसाधन सचिव यु.पी. सिंह उपस्थित होते.
            यावेळी श्री गडकरी म्हणालेपाण्याचा अचूक वापर व योग्य नियोजन महत्वाचे बनले असून पाण्याच्या नियोजनवरच देशाचा विकास अवलंबून आहे. जलसंधारण क्षेत्रात जनजागृती करण्याच्या उद्देशाने जल पुरस्काराची सुरवात करण्यात आली आहे, असे सांगुन श्री. गडकरी म्हणाले,महाराष्ट्रामध्ये जलसंधारण क्षेत्रात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. राज्य शासनाने नुकतेच 170 पुलवजा बंधारे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून यामुळे महाराष्ट्राचे चित्र पालटणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे या भागात पाण्याचे साठे निर्माण झाले आहेत. राज्य सरकारने तयार केलेली बळीराजा योजनाही शेतक-यांच्या हीताची ठरत आहे असे ही श्री. गडकरी यावेळी म्हणाले. 
महाराष्ट्राला 10 राष्ट्रीय जल पुरस्कार
देशपातळीवरील पहिल्या राष्ट्रीय जल पुरस्कारासह महाराष्ट्राला विविध श्रेणींमध्ये 9 पुरस्कार आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये अहमदनगर,लातूरबीडवर्धा या जिल्ह्यांनी  चमकदार कामगिरी केली आहे.
भूजल पुनरुज्जीवनात अहमदनगर देशात सर्वोत्कृष्ट जिल्हा
जलयुक्त शिवार योजना व राज्य शासनाच्या जलसंधारण विषयक विविध कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीतून अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या भूजल पुनरुज्जीवनाच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.  देशाच्या पश्चिम विभागातून भूजल पूनरुज्जीवनामध्ये अहमदनगर  जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि जिल्हाधिकारी राहुद द्विवेदी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  
नदी पुनरुत्थानासाठी पश्चिम विभागातून लातूर जिल्हा देशात अव्वल ठरला असून जिल्हयाचे पालक मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पुरस्कार स्वीकारला तर नदी पुनरुत्थानासाठी याच विभागातून वर्धा जिल्ह्याला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी पुरस्कार हा स्वीकारला. जलस्त्रोताचे पुनरुत्थानासाठी पश्चिम विभागातून बीड जिल्हा देशात अव्वल ठरला असून जिल्हाधिकारी एम.डी. सिंग यांनी पुरस्कार स्वीकारला.
सोलापूर जिल्ह्यातील महूद ग्रामपंचायत ठरली सर्वोत्तम
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद ग्रामपंचायतीने केलेल्या जलसंधारणाच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. महूद ग्रामपंचायत देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरली असून ग्रामपंचायत अंतर्गत ओढा खोलीकरणपाझर तलावातील गाढ काढुन केलेले पुनरुज्जीवनविहिर पुनर्भरणवनराई बंधारे आदी कामे जनसहभागातून व राज्याच्या महत्वाकांक्षी जलशिवार योजनेतून पार पडली. याच कामाची पावती म्हणून ग्रामपंचायतीला  जलसंधारण क्षेत्रातील कामासाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला.  सरपंच बाळासाहेब ढाळे आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण देशात अव्वल
राज्यात जलसंधारण विषयक  विविध कार्यक्रमांचे प्रभावी  नियमन करणारे राज्य शासनाचे पुणे स्थित महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण देशात सर्वोत्तम ठरले आहे. प्राधिकरणाला उल्लेखीनय कामासाठी आज सर्वोत्तम पुरस्कारने गौरविण्यात आले. प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. के. पी. बक्षी यांनी हा पुरस्कार स्वीकारला जलसंधारणातील सर्वोत्कृष्ट संशोधनकल्पना व नवतंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोगा साठी वर्धा येथील  सद्भावना ग्रामीण विकास संस्थेला तिस-या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेचे प्रमुख  मिंलीद भगत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सह्याद्री वाहिनीचा जनता दरबार’ ठरला सर्वोत्तम टीव्ही शो
जलसंधारण क्षेत्राविषयी जनजागृती व शासनाच्या जलसंधारण विषयक योजनांची प्रभावी माहिती देणारा टिव्ही शो म्हणून दूरदर्शन सहयाद्री वाहिनीवरील जनता दरबार’ हा विशेष कार्यक्रम देशात सर्वोत्तम ठरला. या कार्यक्रमला आज गौरविण्यात आले.  जनता दरबार’ कार्यक्रमाच्या दिग्दर्शक स्वाती पाटणकर आणि निर्माते कमलेश चंगेडिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महासिंचन विकास पत्रिका आणि लोकमत ठरले सर्वोत्तम प्रादेशिक माध्यम
जलसिंचन व जलसंधारण विषयक जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.  हिंदीइंग्रजी आणि प्रादेशिक अशा तीन श्रेणीमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रादेशिक श्रेणीत  दोन्ही पुरस्कारांवर महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांनी मुद्रा उमटवली. पुणे येथील महासिंचन विकास पत्रिकेला प्रथम पुरस्काराने तर दैनिक लोकमतला द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बावस्कर यांनी पुरस्कार स्वीकारला. 
लातूर येथील शासकीय निवासी शाळेचा सन्मान
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जाऊ येथील अनुसूचित जाती नवबौध्द मुलींची  निवासी शासकीय शाळेच्या जलसंधारण विषयक कामाची दखल राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी घेण्यात आली. शाळेच्या विद्यार्थींनी व शिक्षकांनी श्रमदानातून केलेल्या जलसंधारण विषयक कामामुळे भुजल स्तर वाढण्यात मोलाची मदत झाली.  शाळेच्या या उल्लेखनीय कामाची दखल घेवून शालेय श्रेणीत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हयाचे पालक मंत्री संभाजी पाटील निलंगेकरजिल्हाधिकारी जी. श्रीकांतआणि शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय मुखम  यांनी हा  पुरस्कार स्वीकारला.