लेकरांची मनोरंजनपर नाटिका, गाणी सादर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

लेकरांची मनोरंजनपर नाटिका, गाणी सादर

बळसाणेत हस्ती पब्लिक प्री प्रायमरी स्कूल तर्फे स्नेहसंमेलन


खबरबात/गणेश जैन, धुळे

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे गावी हस्ती प्री प्रायमरी पब्लिक स्कूल मार्फत नुकतेच वार्षिक क्रिडा महोत्सव व  स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कलागुण दर्शन व नाटिका सादर करीत उपस्थितांची मने जिंकली यावेळी दोंडाईचा स्थानिक सल्ला समिती चेअरमन डॉ.विजय नामजोशी , व्हाईस चेअरमन दिलीप वाघेला व हस्ती प्री प्रायमरी स्कूल चे चेअरमन कैलास जैन , बळसाणे स्कूल समिती चेअरमन योगेश जैन क्रिडा महोत्सवाचे उदघाटक लोणखेडी गावाचे पो.पा.राहुल सोनवणे व देवीचे पो.पा.ज्योती धिवरे अध्यक्षस्थानी होते त्याचप्रमाणे स्नेहसंमेलनाचे उदघाटक बळसाणे येथील लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग महाले व दुसाणे येथील पो.पा. रावसाहेब खैरणार अध्यक्षस्थानी होते व कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हस्ती स्कूल चे संचालक प्रकाश भांडारकर , आप्पा धिवरे (पो.पा.रेवाडी) आनंदा पाटील (पो.पा.बळसाणे),जयदीप गिरासे (पो.पा.कढरे) समिती सदस्य सुनिल खांडेकर , दिपक महाले ,  शरद भदाणे , समाधान बागूल , रविंद्रसिंग गिरासे , जितेंद्र महाले तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

 झालेल्या स्नेहसंमेलनात श्री गणेशाच्या आरतीने झाली व देवा तुझ्या दारी आलो , पारंपरिक न्रुत्य , कव्वाली , गोंधळगीते , कोळीगीते , देशभक्ती पर गाणे , बालगीते , नाटिका , मुकानिभय , विनोदी चुटके प्रेक्षकांसमोर सादर केले कार्यक्रमाच्या यशस्वी साठी मुख्यध्यापक अमोल चौधरी , कैलास खांडेकर सुत्रसंचालन कविता पाटील यांनी केले यावेळी भारतीय शहिद वीर जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.