पोलीस निरीक्षकवर बलात्काराचा गुन्हा दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

पोलीस निरीक्षकवर बलात्काराचा गुन्हा दाखल

एक वर्षापासून मूलीवर करीत होता अत्याचार 

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:

पोलीस स्टेशन वाडी येथे कार्यरत दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव याने सरकारी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापीत करून शारीरिक शोषण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी समोर आल्याने वाडी पोलिसात खळबळ माजली होती अटकेच्या भीतीपोटी जाधव वैद्यकीय रजेवर गेले होते व अटकपूर्व जामीनही मिळविला होता.पीडिताच्या लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 प्राप्त सूत्रांच्या माहितीनुसार पिडिता ही नागपूर शहरातील असून पोलीस विभागातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची मुलगी होती पिडिता वाडी पोलीस स्टेशनला ३१ डिसेंबर २०१७ रोजी  एका मुलीच्या मिसिंग बाबत तक्रार करण्यासाठी मैत्रिणीसोबत आली असता प्रशांत जाधव यांच्या संपर्कात आली होती त्याने या प्रकरणात तिला मदत केली.व तिचा नंबर घेऊन सारखे फोन करून तू मला भेटायला ये तुझा फोटो पाठव मला झोप येत नाही,आपण कुठेतरी फिरायला जाऊ .माझा संपूर्ण परिवार एका अपघातात संपला असून माझे आता कुणीही नाही.मी तुझ्या सोबत लग्न करतो .तुला शासकीय नोकरी लावून देतो .घर घेऊन देतोअशा प्रकारचे आमिष देत नेहमी केविलवाणी विनंती करायचा त्याच्या या भूलथापाना बळी पडली असता जयताळा नागपूर तसेच शहरातील विविध ठिकाणी भेटी घेत होता फेब्रुवारी २०१८ मध्ये नोकरी लावण्यासाठी बायोडाटा दे म्हणून डिफेन्स गेट क्रमांक २  जवळ सायंकाळी बोलाविले तेथून पोलीस निरीक्षक  प्रशांत जाधव याने डिफेन्स स्थित सेकटर नंबर १ / ३ / ७१ क्वॉर्टर नंबर ६  मध्ये नेऊन रात्रभर पीडितास तेथे थांबवून प्रथम शारीरिक शोषण केले दुसऱ्या दिवशी कोल्हापूर येथे जाधव निघून गेला.

गांवावरून परत आल्यावर पिडिता दातांची तपासणी करण्याकरिता लता मंगेशकर येथे आहे अशी माहिती मिळाल्यावर तिला त्याने परत डिफेन्स मधील  क्वॉर्टर मध्ये आणून लग्नाचे आमिष दाखवित शोषण केले अशाप्रकारे नित्यनियमाने तो पीडितावर बलात्कार करीत होता. तो पीडिताला गर्भनिरोधकाच्या गोळ्या देत असल्याने शारीरिक संबंध होऊनही गर्भधारणा झाली नाही . मध्यंतरी  जाधवने नसबंदी केल्याने दोघात वाद झाला त्यादिवशी सुद्धा पीडिताला मारहाण करून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थपित करून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता.आपली फसवणूक झाली असल्याचे पीडिताच्या लक्षात येताच ती वाडी पोलीस स्टेशनला संबंधित अधिकाऱ्याला भेटायला वारंवार यायची पण त्याची भेट व्हायची नाही.हे प्रकरण दडपण्यासाठी वाडी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला .या बाबतची एक बैठक तिच्या नातेवाईक व पोलिसांची राहुल हॉटेलमध्ये बैठकही झाली होती.परंतु पिडिता तडजोड करायला तयार झाली नाही .आपली तक्रार वाडी पोलीस घेणार नाही म्हणून शेवटी पिडिताने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची लेखी तक्रार पोलीस आयुक्तकडे केली असता या प्रकरणाची चौकशी डीसीपी यांनी एसपी यांनी केली असता पिडिताने आरोपा संदर्भात दिलेल्या पुराव्यात चौकशीत तथ्य आढल्याने पोलिसांनी पीडितास लेखी तक्रार देण्याची सूचनेनुसार पीडिताच्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव वर अ जा ज अ प्र कायदा १९८९  कलम ३ ( १ ) ( १२ ) ३ ( २ ) ( ५ ) सहकलम३७६ ( २ ) ( ए ) ( एन ) ३२३ , ५०६  नुसार वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.