बाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

बाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर ITD विभागाची धाड

खाली हात परतले अधिकारी 
ललित लांजेवार:

 चंद्रपूर-वणी -आर्णी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपूर येथील नवनिर्मानाधींन घरील पक्ष कार्यालयावर निवडणुक भरारी पथक व ITD (प्राप्तिकर )विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.हि छापेमार कारवाई बुधवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान करण्यात आली,मात्र चौकशी दरम्यान अधिकाऱ्यांना यात काहीच मिळाले नसल्याने प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना खाली हात परतावे लागले.शहरात निवडणूकीचा महोल आहे,त्याचसोबत प्राप्तिकर विभाग देखील देशातील विविध राजकारणाशी संबंधीत अधिकाऱ्यांच्या घरी छापे टाकत आहे,अश्यातच चंद्रपूरची लढत यावेळी दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी महत्वाची असल्याने चंद्रपूरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या काळात हे छापे टाकले जात आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

 आमच्या उमेदवाराला त्रास देण्याचा प्रकार सत्ताधारी करत आहेत , निवडणुकीचा माहोल लक्षात आल्यामुळे हे सगळे कारनामे सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचे वडेट्टीवार त्यांनी म्हटले.