चंद्रपुर:भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी व महामंडळाच्या बसचा भीषण अपघात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

चंद्रपुर:भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी व महामंडळाच्या बसचा भीषण अपघात

 एक प्रवासी जखमी;चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील घटना
नागपूर/ललित लांजेवार:

भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने एसटी महामंडळाच्या बसला जोरदार धडक दिली.या अपघातात एक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.हि घटना चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूरवरून चारचाकी वाहन MH.34.BB.1413 बल्लारपूरकडे    जात  होते.तर एसटी महामंडळाची बसMH.40.M.9460 बल्लारपूरहून चंद्ररपूरकडे जात होती.मात्र चारचाकी वाहन हे अतिवेगाने होते.त्यामुळे वाहनाचे संतुलन बिघडले व समोरून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला जोरदार धडक दिली.
यात चारचाकी वाहन संपूर्ण बसला घासत गेल्याने बस मध्ये बसून असलेल्या एका प्रवाश्याला दुखापत झाली.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.यात चारचाकी वाहन समोरून पूर्णपणे चकनाचूर झाले, घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.