नागपूरच्या गंगाजमुना परिसरात इमारत कोसळली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

नागपूरच्या गंगाजमुना परिसरात इमारत कोसळली

नागपूरच्या गंगाजमुना परिसरात इमारत कोसळली साठी इमेज परिणाम

नागपूर/प्रतिनिधी: 
नागपुरातील रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरात मंगळवारी रात्री एक जुनी इमारत कोसळली. या इमारतीच्या मलब्यात दबून चार जणी गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.

सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जीर्ण झालेली ही इमारत कोसळली. उपस्थित नागरिकांनी मलब्यात दबलेल्या महिला-तरुणींना बाहेर काढण्यात आले. या घटने नंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहचेपर्यंत घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. मलब्यात दबलेल्या चौघींनाही बाहेर काढण्यात आले. त्यांच्या सोबत असणार्नाऱ्या एका श्वानाचाही मृत्यू झाला,या जखमींना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लकडगंज पोलिसांनी सांगितले.