महिलांच्या हक्कासाठी लढनारी संस्था म्हणजे यंग चांदा ब्रिगेड:किशोर जोरगेवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

महिलांच्या हक्कासाठी लढनारी संस्था म्हणजे यंग चांदा ब्रिगेड:किशोर जोरगेवार

यंग चांदा ब्रिगेडचा महिला मेळावा संपन्न
हजारो महिलांची उपस्थिती
चंद्रपूर/प्रतिनिधी:

सक्षम समाज घडविण्यात महिलांचा वाटा नेहमी मोठा राहला आहे. याचे अनेक दाखले इतिहासात मिळेल. मात्र आजची महिला अनेक समस्यांना त्रस्त आहे. या सर्व महिलांना न्याय देण्यासाठी सुरु केलेली ही संस्था असून यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांनी शेवटच्या गरजू महिलेपर्यंत पोहचवुन तिला न्याय देण्यासाठी संघर्ष करावा असे आव्हाहण यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी केले. रविवारी जैन भवन येथे यंग चांदा ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्याच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला, यंग चांदा ब्रिगेडच्या वंदना हातगावकर, साहिली येरणे, कल्पना शिंदे, चंदा ईटनकर, प्रेमिला बावणे, नंदा पंधरे, विजया बच्छाव, जमीला मेश्राम, भाग्यश्री हांडे, तणूशा शेख, कविला शुक्ला, पुजा शेरकी, यांच्यासह महिला पदाधिका-यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. आजची स्त्री सक्षम असली तरी संसाराचा गाळा चालवित असतांना त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. त्यामूळे मागील काही दिवसांपासून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने प्रत्येक प्रभागात महिलांच्या आरोग्य शिबीर घेण्यात येत आहे. यात महिलांही मोठया संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेत आहे. प्रत्येक प्रभागात आज यंग चांदा ब्रिगेडच्या शाखा सुरु झाल्या आहे. त्यामूळे या महिलांचे प्रश्न सोडविण्यासह त्यांना सक्षम करण्याची मोठी जवाबदारी आमच्यावर आहे. त्यामूळे येत्या काळात या महिलांच्या ससक्षमीकरनासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिलांना स्वयंम रोजगाराचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आज यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यात महिलांच्या अनेक समस्यायेत आहे. आणि यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शाखेच्या वतीने या सर्व समस्या सोडविण्यात आम्हाला यश आले आहे. 

त्यामूळे यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शाखेची जवाबदारी वाढली असून यंग चांदा ब्रिगेडच्या प्रत्येक महिलांना शेवटच्या गरजू पर्यंत पोहचून त्यांनी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा या कार्यात मी सर्दैव यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही यावेळी बोलतांना किशोर जोरगेवार यांनी दिली. या मेळाव्यात यंग चांदा ब्रिगेडच्या सर्व महिला शाखा प्रमुखांसह महिला सदस्यांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.