महानिर्मितीच्या कंत्राटदार,पुरवठादारांची बैठक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०७ जुलै २०१९

महानिर्मितीच्या कंत्राटदार,पुरवठादारांची बैठक

९ जुलैला खापरखेडा बैठक

१० जुलैला कोराडी बैठक

नागपूर/प्रतिनिधी:महानिर्मितीने नव्याने एकीकृत ई-निविदा “पुरवठा-संबंध-व्यवस्थापन” हि प्रणाली अंगीकृत केली आहे. अनुकूल खरेदी रणनीती, कंत्राटदार/पुरवठादारांच्या समूहासमवेत दीर्घकालीन संबंध, खरेदी प्रक्रिया सोपी, सुटसुटीत करणे, संपूर्ण खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शी करणे हा या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामागचा प्राथमिक उद्देश आहे.


कुठल्याही संस्थेच्या विकासात, “पुरवठा-संबंध” याची महत्वाची भूमिका असते. ई-निविदा एस.आर.एम. पद्धती नवी असल्याने सध्यस्थितीत याचा वापर करताना अडचणी निर्माण होणे स्वाभाविक आहे. पुरवठादारांच्या ह्या समस्येचे तातडीने निरसन करण्यासाठी महानिर्मिती अंतर्गत नोंदणीकृत  राज्यभरातील कंत्राटदार/पुरवठादारांची औष्णिक विद्युत केंद्र निहाय बैठक खापरखेडा(९ जुलै), कोराडी(१० जुलै), पारस(११ जुलै), भुसावळ(१२ जुलै), नाशिक(१६ जुलै) आणि परळी(१९ जुलै) येथे आयोजित करण्यात येत आहेत. ह्या बाबतचा तपशील महानिर्मितीच्या www.mahagenco.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

कंत्राटदार/पुरवठादारांना बैठकीबाबतची माहिती त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एस.एम.एस. व ई-मेलद्वारे देखील पाठविण्यात आलेली आहे. 


महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) नितीन चांदुरकर तसेच एस.आर.एम. प्रणालीचे तज्ज्ञ व्यक्ती या बैठकीत मार्गदर्शन करणार असून कंत्राटदार/पुरवठादार यांच्या समस्या जाणून घेणार आहेत व त्या अनुषंगाने समस्येचे निराकरण करण्यात येणार आहे. 


मंगळवार ९ जुलै २०१९ रोजी सकाळी ११ वाजता सौदामिनी प्रशासकीय इमारत, खापरखेडा औष्णिक  विद्युत केंद्र तर १० जुलै २०१९ रोजी सकाळी ११ वाजता, ६६० मेगावाट सेवा इमारत, चवथा माळा, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथे बैठक आयोजित केली असून खापरखेडा-कोराडी तसेच नागपूर जिल्ह्यातील कंत्राटदार/पुरवठादारांनी सदर बैठकीत सहभागी व्हावे. बैठक समन्वयक म्हणून कार्यकारी अभियंता खापरखेडा भास्कर शेगोकार (मो.८४११९७८६४३), कार्यकारी अभियंता कोराडी शशिकांत वेले (मो.८४११०९४९२२) हे कार्यभार सांभाळणार आहेत.   


तरी जे कंत्राटदार/पुरवठादार महानिर्मितीच्या खापरखेडा व कोराडी औष्णिक विद्युत केंद्र, प्रकल्प, स्थापत्य, बांधकाम, प्रशिक्षण आणि कोळसा कार्यालय नागपूर येथे नोंदणीकृत आहेत त्यांनी या बैठकीस आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य अभियंते प्रकाश खंडारे, राजेश पाटील, राजकुमार तासकर, दिलीप धकाते व अनंत देवतारे  यांनी केले आहे.