खापरखेडा वीज केंद्राचा २००० वृक्ष लागवडीचा संकल्प - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०२ जुलै २०१९

खापरखेडा वीज केंद्राचा २००० वृक्ष लागवडीचा संकल्प

नागपूर/प्रतिनिधी:


१ जुलै, २०१९ रोजी कृषी दिना निमित्त  खापरखेडा औ.वि.केंद्र च्या वतीने प्रकाश नगर वसाहत येथे २००० वृक्षारोपण लागवडीस सुरुवात झाली असून एक आठवड्यात हे ध्येय पूर्ण करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्री. प्रकाश खंडारे,मुख्य अभियंता होते.वन सप्ताह व कृषी दिनाचे निमित्ताने महाराष्ट्र शासन व वनविभागाच्या आदेशानुसार २००० झाडांच्या लागवडीसाठी प्रकाशनगर वसाहत येथील मोकळ्या जागेत स्थापत्य विभागाच्या सहकार्याने मान्यवरांच्या हस्ते झाडे लावण्याचा शुभारंभ करण्यात आला.

अमलतास,आपटा, अर्जुन,आवळा ,अशोका बकाना ,बकुळ ,बेल,चाफा,चिंच,गुलमोहर,हिरडा,जाकरंडा,कदंब,मुंगना,कडुलिंब,पारिजातक,पिंपळ,चिकु,फणस,जांभूळ,आंबा इत्यादी प्रकारची वृक्ष लागवड करण्यात येत आहे.

याप्रसंगी श्री.राजेंद्र राऊत,उपमुख्य अभियंता,श्री. शरद भगत, उपमुख्य अभियंता,सर्वश्री अधिक्षक अभियंता,श्री.परमानंद रंगारी,श्री.सुनिल रामटेके, श्री.विलास मोटघरे, श्री.भारत भगत,श्री.जितेंद्र टेंभरे,वैद्यकिय अधिक्षक डॉ.मिलिंद भगत, श्री.दिलीप मानकर,श्री.सुनिल देवगडे,श्री.अशोक चिपडे, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा,श्री.डार्विन फुल्लुके,वरीष्ठ व्यवस्थापक लेखा, कार्यकारी अभियंता श्री.भास्कर शेगोकार,श्री.गणेश मुटकुरे यांसह औष्णिक विद्युत केंद्रातील पुरुष व महिला अधिकारी /कर्मचारी,विभाग प्रमुख, संघटना प्रतिनिधि उपस्थित होते.वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थापत्य विभागाने अथक परिश्रम घेतले.