दवलामेटीत युवकाची विष घेऊन आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

२० जुलै २०१९

दवलामेटीत युवकाची विष घेऊन आत्महत्या

 नागपूर / अरुण कराळे:



 वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या दवलामेटी येथील गणेश नगर झोपडपट्टीतील निवासी प्रफुल सिध्दार्थ जोगेकर वय २४ यांनी विष घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे .या घटनेमुळे परिसरात  सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

    पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मृतक हा दारूच्या व्यसनाधीन झाला होता . शनिवार २० जुलै रोजी  रात्री दोन वाजताच्या सुमारास राहत्या घरी  फिनाईल प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले . त्याचा मावस भाऊ दिनेश दांदगे यांच्या लक्षात येताच पोलीस स्टेशनला माहीती दिली .आत्महत्याचे  नेमके कारण समजले नाही.       

   घटनेची माहिती मिळताच  सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश जायभाये,शिपाई आशिष लोनकर घटनास्थळी जावून   पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणी करीता शासकीय रुग्णालयात पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.