नागपूर:भीषण अपघात ५ठार;खासगी बसची ट्रकला धडक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०८ जुलै २०१९

नागपूर:भीषण अपघात ५ठार;खासगी बसची ट्रकला धडक

२५जखमी,मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
चांपा/प्रतिनिधी:


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून प्रवाशांना घेऊन नागपूर येणाऱ्या महालक्ष्मी खासगी बसने उभ्या असलेल्या ट्रकला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ प्रवासी ठार झाल्याची दुःखद घटना रविवारी रात्री ९.४५  वाजताच्या सुमारास 
पाचगाव शिवारातील कुही फाट्याजवळ घडली .या घटनेत २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे .


MH४९/AT-६७५४ क्रमांकाची महालक्ष्मी कंपनीची खासगी बस ब्रम्हपुरी येथून नागपुरकडे भरधाव येत होती . ही शेवटची बस असल्याने
प्रवाशांची संख्याही जास्त होती.

पाचगाव शिवारातील कुही फाट्याजवळ रस्त्यावर एमएच-३१/सि बि -७६५६ क्रमांकाचा ट्रक उभा होता .वेगात येणारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकवर धडकली .आघात एवढा जोरात होता की , बसचा समोरील भाग चक्काचूर झाला .तर २५जण गंभीर जखमी झाले .मृतांमध्ये बस चालक कार्तिक ईश्वर गोंगल वय ३५,रा उमरेड , शंकर कटूजी केवट वय ४५रा नरसाळा.याची पत्नी प्रमिला शंकर केवट वय ४१रा नरसाळा नागपुर व सोनू ठाकरे वय ३१यांचा समावेश आहेत .

यातील काही गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे .माहिती मिळताच कुही पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले .सर्व जखमींना नागपुरच्या शासकीय रुग्णालयात हलविले .


तिथे त्यांच्यावर उपचार सूर आहेत .महालक्ष्मी खासगी बसचा पुढील भाग चक्काचूर झाल्याने जखमींना बाहेर काढल्यानंतर त्यांना लगेच उपचारासाठी पाठविण्यात आले .याप्रकरणी कुही पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे .सुनीता शेंडे , मिरा डहारे , रमेश उरकुडे, दिलीप डहारे , प्रवीण गंगावानी , लता लोथे , सोनाली मोहिते , विधी मोहिते , गोविंद मोहिते , सिमा ठाकरे , आदींचा जखमीमध्ये समावेश आहे .


अनिल पवार,उमरेड