चंद्रपुरात क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड:5 जणांना अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०८ जुलै २०१९

चंद्रपुरात क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड:5 जणांना अटक

LCB ची कारवाई

चंद्रपूर/प्रतिनिधी:



शनिवारी भारत-श्रिलंकेविरुद्धच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळला जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घालून पाच जणांना अटक केली. ही कारवाई नगिनाबाग परिसरात शनिवारी रात्री १० वाजता करण्यात आली.



मिळालेल्या माहितीनुसार, नगिनाबाग परिसरातील एका घरात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने धाड घालून सदर घरातून पाच जणांना ताब्यात घेतले. 



यावेळी घटनास्थळावरून पाच मोबाईल, एक लॅपटॉप, एक एलइडी टिव्ही संच आणि खुर्च्या, टेबल आणि रोख रक्कम असा १ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाच आरोपींवर जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.