चांपा येथे राजस्व अभियानाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

१३ जुलै २०१९

चांपा येथे राजस्व अभियानाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

उमरेड/प्रतिनिधी:
तहसिल कार्यालय उमरेड व गट ग्रामपंचायत चांपा यांच्या संयुक्त विद्यमाने चांपा ग्रामपंचायत येथे राजस्व अभियान अंतर्गत विविध शासनाच्या योजनांच्या शिबिर ला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. चांपा , खापरी , मांगली ,उण्द्री , हळदगाव , परसोडी , तिखाडी , उमरा, उटी , खापरी राजा , वडद ,  राजूरवाडी , आदी चांपा परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय  चांपा येथे मोठी गर्दी केली .शासकीय विविध योजनांचे शिबिर मध्ये  312 प्रकरणे निकाली काढण्यासाठी स्वता उमरेडचे राजस्व उपविभागीय अधिकारी जे .पी .लोंढे व तहसिलदार प्रमोद कदम यांनी स्वता राजस्व समाधान शिबिर चांपा येथे उपस्थितीत लाभार्थ्यांना तत्काळ लाभ दिला .असून राजस्व अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजनांच्या शिबिरात अंदाजे सातशे ते आठशे लोकांनी राजस्व अभियानाचा लाभ घेतला .

व राजस्व अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये समाधान शिबिर मध्ये राशनकार्ड ३२ , जातीचे प्रमाणपत्र ११५ , उत्पन्न प्रमाणपत्र३१ , मतदान कार्ड२५ , श्रावणबाळ व निराधार योजना १२, उज्वला योजना४५ , डोमिसियल प्रमाणपत्र १८, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र १ , जिवनज्योती विमा योजना , सुकन्या योजना , अटल पेन्शन योजना ३ , शपथपत्र 38 एकूण ३१७ प्रकरण आदी योजनांना नागरिकांनी मोठी प्रचंड गर्दी केली .यावेळी उमरेडचे राजस्व उपविभागीय अधिकारी जे .पी .लोंढे व तहसिलदार प्रमोद कदम यांच्या हस्ते विविध शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला .

व राजस्व अभियान मध्ये योजनांचा लाभ देतांना राशनकार्ड , उत्पन्न प्रमाणपत्र आदी योजनांच्या लाभार्थ्यांना आदेश पत्र देऊन वाटप करण्यात आला .यावेळी चांपा ग्रामपंचायतचे सरपंच अतिश पवार होते .अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी  बहादूरकर  पाचगावचे मंडळ अधिकारी भुरे , मुरमे , आरघोडे , आरेकर , चांपा तलाठी प्रियंका अलोने , ग्रामसेवक सुनील तायवाडे , सेतू कनिष्ठ लिपिक योगेश डहाके , आपले सरकार सेवाचे  चंदन डांगे अनिल खोडे आदीच्या सहकार्याने राजस्व अभियान यशस्वीपणे पार पडले .