रेल्वेत गुंगीचे औषध देऊन लुटणारी टोळी वर्ध्यात जेरबंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

रेल्वेत गुंगीचे औषध देऊन लुटणारी टोळी वर्ध्यात जेरबंद

वर्धा/प्रतिनिधी:
robbers gang in Railway aressted in Wardha | गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणारी टोळी वर्ध्यात जेरबंद
 रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी प्रवाशांशी जवळीकता साधून त्यांना एखाद्या खाद्यपदार्थात गुंगीचे औषध देऊन त्यांचे साहित्य लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला वर्धा लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. 

या घटनेत पोलिसांनी ४ आरोपींना तक केली आहे.अधिक चौकशी केली असतांना आरोपींनी सुमारे १३ गुन्ह्याची कबुली लोहमार्ग पोलिसांना दिली,या टोळीतील तीनही सदस्य व एक महिला तरुण असून ते उत्तरप्रदेश राज्यातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर महिला ही दिल्ली येथील रहिवासी आहे. 
कन्हैय्या सुकई यादव (२३), मनोजकुमार रामनरेश सिंग (२२), सोनू रामअभिलाश शुक्ला (२४) व सीमा मनोजकुमार सिंग (२२) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.