कर्नाटका एम्टाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतन द्या:खासदार धानोरकर यांनी लोकसभेत मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

कर्नाटका एम्टाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतन द्या:खासदार धानोरकर यांनी लोकसभेत मागणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

गेल्या साडेचार वर्षांपासून भद्रावती परिसरातील कर्नाटका एम्टा खाण बंद आहे. येथील कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यांना तात्काळ वेतन द्या, अशी मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली.

२००८ ते २०९५ या कालाबधीत भद्रावती जवळील चेकबरांज परिसरात कर्नाटका एम्टा कोल लिमिटेड नावाची कोळसा खदान सुरू होती. या खदानोसाठी भद्रावती परिसरातील अरांज मोकासा, चेकबरांज, तांडा, पिपरयोडी, ब्रोनथळा येथील जवळपास चौदाशे हेक्‍टर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. त्यातून प्रभावित झालेले ४६८ कामगार या कोळसा खदानीत कार्यरत होते. मध्यंतरी देशातील ४४ चालू खदानी यंद करण्यात आल्या, त्यात भद्रावती येथील कर्नाटक एटा खाणही समाविष्ट होती. खाणच बंद झाली.

त्यामुळे येथील कामगारांना वेतन नसल्याने कामगारांचे आर्थिक भविष्य असुरक्षित झाले.कामगारांतर्फे अनेकदा आंदोलने करण्यात आली. पण त्यात कामगारांना यश मिळाले नाही. 

त्यामुळे कामगारांचे भवितव्य अधांतरी ठरले. कामगार हित लक्षात घेऊन हा मुद्दा खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकर यांनी पहिल्यांदा संसदेत लावून धरला.आणि प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या. आपल्या भाषणात धानोरकर यांनी सांगितले की पश्चिम बंगालमध्ये याच खाण कंपनीने संयुक्त उपक्रम सुरू केला. पश्‍चिम यंगालमध्ये खाणी सुरु होणार आहेत. नवे कंत्राटदार त्यासाठी शोधण्यात आले.

महाराष्ट्रात मात्र यातील काहीच झाले नाही. शिवाय सीएसआर निथीदेखील पडून आहे. कामगारांची ज्यलंत समस्या खासदारांनी लोकसभेत उचलल्याने कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या.