वाडीतील ट्रक चालकाला अमानुष मारहाण प्रकरणातील पाच आरोपींना अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

२९ जुलै २०१९

वाडीतील ट्रक चालकाला अमानुष मारहाण प्रकरणातील पाच आरोपींना अटक

एक दिवसाची पोलीस कोठडी 

नागपूर/प्रतिनिधी:एक आठवड्यापासून ट्रक चालकाने केरळ ( त्रिवेंद्रम ) येथील माल ट्रान्सपोर्ट कार्यालयातून भरून ट्रक घेऊन गेला परंतु तो तिकडे न नेता अॅॅडव्हास व डिझेल भरायला दिलेले पैशाची मौजमस्ती करून फरार चालकाला पकडून मालकाने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन बेदम अमानुष केल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलिसांनी ट्रकचा मालक आरोपी अखिल भाऊराव पोहनकर,अमित साहेबराव ठाकरे रा .दत्तवाडी यांना रविवार २८ जुलै रोजी अटक केली असून इतर तीन आरोपींना सोमवार २९ जुलै रोजी वाडी पोलीसांनी अटक केली . 

प्राप्त पोलीस माहितीनुसार अखिल भाऊराव पोहनकर वय ३० रा . दत्तवाडी यांच्या ट्रकवर विक्की सुनील आगलावे वय २८ रा . कळंबी ता . कळमेश्वर जि. नागपूर हा चालक म्हणून अनेक दिवसांपासून काम करीत आहे .मागील एक आठवड्यापूर्वी वाडी येथील गोदमातून केरळ येथील त्रिवेंद्रम येथील माल ट्रकमध्ये भरला होता,तसेच अॅडव्हान्स म्हणून ३० हजार रुपये व डिझेल भरण्यासाठी ३ हजार रुपये चालकाला दिले होते .

चालक विक्की याने ट्रक गोडावून मधून काढून केरला येथे न जाता अन्य ठिकाणी नेऊन ठेवला व सोबत असलेल्या पैशातून मौजमस्ती केली .तेंव्हापासून ट्रक मालक अखिल पोहनकर त्याला शोधात असतांना तो शनिवारी त्यांना मिळाला असता आपल्या अन्य साथीदारांना बोलावून वडधामना येथील ट्रान्सपोर्ट कार्यालयात नेऊन त्याचे कपडे काढून  वर बांधून बेदम अमानुष मारहाण केली व याचा व्हिडीओ सुद्धा काढला.

मारहाणीचा व्हिडीओ आरोपीपैकी कुणीतरी व्हायरल केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला गंभीर घेत वाडी पोलिसांना सूचना देत चौकशी करण्याचे आदेश देताच आरोपी अखिल व त्याचा साथीदार अमित ठाकरे यास अटक करून ३०७ कलमांनव्ये गुन्हा दाखल केला असून  सोमवार २९ जुलै रोजी इतर तीन आरोपीना वाडी पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलीस कोठडी घेण्यासाठी न्यायालयात हजर करून सात दिवसाची कोठडी मागितली असता एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली.

आरोपी ( १ )अखिल भाऊराव पोहनकर वय ३० रा . दत्तवाडी, ( २)अमित साहेबराव ठाकरे वय २९ रा . कळमेशवर, ( ३ ) चंद्रशेखर चेनलाल परसमोडे वय ३४ रा . रावले ले आऊट तकीया वडधामना, (४ ) श्रीराम ईश्वर ईखनकर वय ३३ रा . सुराबर्डी तकीया वडधामना ( ५ ) ओमप्रकाश अशोक चौरे रा .रावले ले आउट यांनी ट्रक चालक विक्की सुनील आगलावे याला लोखंडी रॉड व पट्ट्याने मारहाण करून जीवानाशी मारण्याचा प्रयत्न केलेल्या प्रकरणात उपरोक्त आरोपीना वाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर भादवी कलम१४३ , १४७ , १४८ , ३४२ , ३०७ नुसार गुन्हा दाखल केला.