तेलगु भाषीकांच्या मागण्यांसाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

तेलगु भाषीकांच्या मागण्यांसाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

चंद्रपुर/प्रतिनिधी:                                                   
                          चंद्रपूर जिल्ह्यात राहणा-या तेलगु भाषीकांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज 22 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालया समोर किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरिय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी किशोर पोतनवार, राजू रेड्डी, चिन्ना नलबोगा, कलाकार मलारप, आनंद विरय्या, मनोहर दोतपल्ली, नारायन कोटणाका, प्रेम गंगाधरे, प्रशांत गद्दाला, प्रभू तांडरा, रमेश अंगूरी, अजय मार्कंडवार, कुमार जुनमुलवार, आदि गिरवेनी, देवा कुंटा, आदींची मंचावर उपस्थिती होती.  चांदा तेलगु सेवा संघम समीती, ऑल तेलगू समाज विकास बहुउद्देशीय संस्था, बल्लारशाह  तथा विदर्भ तेलगु समाज यांच्या वतीने हे आंदोलन आयोजीत करण्यात आले होते.

    चंद्रपूर जिल्हा हा औद्योगीक जिल्हा आहे त्यामुळे रोजगाराकरिता विविध भाषिक नागरिक चंद्रपूरात स्थायी झाले आहेत यात तेलगु भाषीक नागरिकांची संख्या मोठी आहेत पिढी दर पिढी चंद्रपूरात वास्तव्यास असलेल्या तेलगू भाषिक नागरिकांना अणेक समस्यांना समोर जावे लागत आहे त्यामूळे त्याच्या विविध मागण्यांना घेउन यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हास्तरिय भव्य धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले होते. दुपारी 2 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलना करीता घूग्घूस, बल्लारशाह, सास्ती, राजूरा, माजरी, यांच्यासह जिल्हातील तेलगू बांधब मोठया संख्येन या आंदोलनात सहभागी झाले होते. 

तेलगु भाषिक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोपी करावी, ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र आहे त्या विद्यार्थ्यांना व्हॅलीडिटी देण्यात यावी, तेलगु भाषिकांसाठी प्रत्येक तालुक्यात भव्य सभागृह बांधण्यात यावे, तेलगु भाषिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, तेलगु भाषिक विद्यार्थ्यांना स्कॉंलरशिप देण्यात यावी, तेलगू भाषिक विद्यार्थ्यांकरीता स्वतंत्र वस्तिगृहाचे निर्माण करण्यात यावे, तेलगु भाषिकांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी निर्माण करण्यात यावी, वेकोली मधून निवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या पेंशनमध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांसह ईतर मागण्यांकडे या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी किशोर पोतनवार, राजू रेड्डी, चिन्ना नलबोगा, कलाकार मलारप, आनंद विरय्या, मनोहर दोतपल्ली, यांच्यासह ईतरांनी मार्गदर्शन केले आंदोलना नंतर एका शिष्ट मंडळाने अप्पर जिल्हाधिका-यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक चर्चा करुन यातील काही मागण्या तात्कार सोडवीण्यात येईल आश्वासन दिले. मागण्या पूर्ण होई पर्यंत या मागण्यांचा सतत पाठपुरावा करत राहू अशी ग्वाही जोरगेवावारांनी बोलतांना तेलगु भाषिकांना दिली.