महावितरणचे वर्धेत ग्राहक संवाद मेळावे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

महावितरणचे वर्धेत ग्राहक संवाद मेळावे

वर्धा/प्रतिनिधी:


   सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील    सर्व  उपविभागातील  कार्यालयांमध्ये वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजन सुरु आहे. . या मेळाव्यात शाखा अभियंत्यापासून अधीक्षक अभियंता जातीने उपस्थित राहून वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेत आहेत. 

 राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संवाद मेळावे घेण्याचे निर्देश दिले होते. यानुसार राज्यात ठिकठिकाणी संवाद मेळावे घेऊन वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यात येत आहेत. अनेक तक्रारीवर ताबडतोब निर्णय  करून वीज ग्राहकांना महावितरण प्रशासनाकडून दिलासा देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. वर्धा जिल्ह्यातील  जिल्ह्यातील वर्धा. आर्वी आणि हिंगणघाट  या विभागांतर्गत असलेल्या सर्व उपविभागिय कार्यालयांमध्ये दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजन सध्या सुरु आहे.  संबंधीत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्वत: ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबील दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी दाखल करून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतील.

  आर्वी विभागातील पुलगाव उपविभागाचे वतीने गुंजखेडा येथे ग्राहक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आर्वी उपविभागातील खुबगाव येथे आयोजित मेळाव्यास सरपंचानी उपस्थिती लावीत गावातील तक्रारी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर  मांडल्या. वडनेर शाखा कार्यालयन्तर्गत असलेल्या फुकटा गावात,  आंजी, पुलगाव उपविभागातील नाचणं गाव येथे वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या.

वर्धा उपविभागात ५ ठिकाणी वीज ग्राहकांशी संवाद साधण्यात आला. वीज देयकाची दुरुस्ती, नवीन वीज जोडणी मिळण्यास होणारा उशीर, कमी दाबाने होणारा वीज पुरवठा अश्या स्वरूपाच्या तक्रारी वीज ग्राहकांनी केल्या. या तक्रारींवर योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. अनेक ठिकाणी वीज ग्राहकांच्या तक्रारी जागच्याजागी सोडवल्या जात असल्याने वीज ग्राहकांनी या संवाद मेळाव्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

वर्धा जिल्ह्यात वीज ग्राहकांचे मेळावे यशस्वी करण्यासाठी मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता डॉ. एस. एफ. वानखेडे, कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे, दिलीप मोहोड, हेमंत पावडे मेहनत घेत आहेत.