चंद्रपुरात तलाव स्वच्छतेसाठी आणलेली देशातील पहिली "केवट" बोट उदघाटनापूर्वीच तलावात बुडाली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

२५ जुलै २०१९

चंद्रपुरात तलाव स्वच्छतेसाठी आणलेली देशातील पहिली "केवट" बोट उदघाटनापूर्वीच तलावात बुडाली

चंद्रपूर/प्रतिनिधी:

सुमारे ५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन इतिहास असलेला शहरातील रामाळा तलाव स्वच्छता व  शुद्धीकरणासाठी आणण्यात आलेली" केवट " ही बोट उदघाटनापूर्वीच गुरुवारी रामाळा तलावात बुडाली.विशेष म्हणजे २५ जुलै रोजी रामाळा तलाव येथे दुपारी २. ३० वाजता सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त, नियोजन व वने तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या शुभहस्ते पार पडणार होते.मात्र उदघाटनापूर्वीच रामाला तलावात बोट बुडाली.


मंत्री महोदयांच्या हस्ते या बोटीचे उद्घाटन असल्याने यंत्रणेने फुलांच्या लडीने या बोटीला चांगले सजविले देखील होते.पालकमंत्री मुनगंटीवार यांचा निर्देशानुसार जिल्हाधिकारी कुणाल खेमणार व आयुक्त संजय काकडे यांनी वेळोवेळी संबंधित प्रकल्पासाठी बैठकी घेतल्या होत्या.

रामाळा तलाव स्वच्छता व  शुद्धीकरणाबाबत जिल्हा प्रशासन व चंद्रपूर शहर महानगरपालिका मागील काही काळापासून सतत कार्यरत आहे. तलाव स्वच्छता व  शुद्धीकरणाचे विविध उपाय यादरम्यान तपासण्यात आल्यानंतर  १ महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर " केवट " ही बोट  मागविण्यात आली होती.

तलावातील दुषित पाणी शुद्ध करण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर केला जात आहे. यामुळे पाण्याचे शुद्धीकरण होऊन तलावाच्या सौंदर्यात भर पडली होती.त्रायामुळे रामाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी हि बोट वापरली जाणार होती मात्र ती उदघाटनापूर्वीच बुडाल्याने विरोधक सोशल मिडीयावर केवटला चांगलेच ट्रोल करू लागले आहे.

                 पावसाळ्यात तलाव स्वच्छ करण्याचा प्रकार अन तेही परिसरातील नागरी वस्तीतून येणारे सांडपाणी बंद न करता तलाव स्वच्छ करणे म्हंजे , आंधळ दळतय अन कुत्र पिठ खात या कामावर शासन नियुक्त सल्लागार गेल्या वर्षभरापासून रामाळा तलावा स्वच्छ करण्याचे केवळ कागदी घोडेच नाचवत आहे , स्थानिकांनी दिलेला सल्ला कधीच एैकला नाही , आता कोटी रूपये पाण्यात टाकले अस आरोप देखील माजी नगरसेवक संजय वैद्य यांनी केला आहे.

 ओमीओम क्लीनटेक या कंपनीद्वारे सदर बोट तयार करण्यात आली असून पाणी सफाई, पाण्याचे शुद्धीकरण असे विविध कार्य करणारी भारतातील पहिलीच बोट आहे.  या १ महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील पाण्याची संपूर्ण स्वच्छता याद्वारे करण्यात येणार आहे.  पाण्यावरील तरंगणारा, खोलात असलेला कचरा व गाळ साफ करण्याचे काम बोटीद्वारे करण्यात येणार आहे. रामाळा तलावातील पाणी सध्या दर्शनीय हिरवे असून  बोटीद्वारे निरंतर स्वच्छतेनंतर तलावाचे पाणी स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.
कुक्कुटपालन खाद्य उपलब्ध