नागपुरातील बेघरांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

२४ जुलै २०१९

नागपुरातील बेघरांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

नागपुर/प्रतिनिधी:

नागपुर शहराच्या फुटपाथवरील बेघर, निराधारांना निवा-याची चांगली सोय उपलब्ध होवून, त्यांचं जगणं सुसह्य व्हावं, यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातंर्गत नागपुर महानगरपालिका, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शहरी बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. 


नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री अझीझ शेख तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे  यांच्या मार्गदर्शनात शहराच्या फुटपाथवरील बेघरांना निवारा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे. 

रिलीफ व्यसनमुक्ती व उपचार केंद्र, नागपुर यांनी नागपुर शहरातील निराधार बेघराना व्यसनमुक्त करण्यास्तव बेघरांसाठी कार्यरत असलेल्या शहरी निवारा सोबत समन्वय करार करण्यात आला आहे. यातून संयुक्त विद्यमानाने शहरी बेघर निवारा, हंसापुरी प्राथमिक व माध्यमिक शाळा, टिमकी, भानखेडा येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

या जनजागृती कार्यक्रमात प्रादेशिक मानसिक रगणालय नागपुर येथील प्रसिध्द मानसिक रोग तज्ञ डॉ. दिपक अवचट यांनी व्यसनाने होणाऱ्या आजारांची माहिती दिली तसेच व्यसनांनी होणाऱ्या शरीरहानीबद्दल माहिती देवुन उपचार पद्धति सांगितली. 

प्रकल्प संचालक नंदा आदमने यांनी व्यसनापासून दूर कसे रहावे ह्याचे मार्गदर्शन केले व गरजूंना औषधोपचारासाठी संपर्क करण्यास सांगितले. समुपदेशक वैभव वैरागडे यांनी व्यसनाधीनता हा गंभीर मानसिक आजार असुन तो वेळीच उपचार करून बरा होऊ शकतो याबाबत समुपदेशन केले. 

कार्यक्रमाच्या सरतेशेवटी सर्व मार्गदर्शकांनी  बेघरांचे व्यसनाधीनतेबाबतचे अनुभव, चर्चा व व्यसन नियंत्रण यासंबंधीत विषयाची उकल केली. 

याप्रसंगी बेघर नागरिकांसह समाजभान जपणारे देवेन्द्रकुमार क्षीरसागर, नितेश नागदेवे, विकास पाटिल, कपिल गेडाम, सुमित निषाद, नरेंद्र शरणागत यांचेसह व्यसनमुक्ती तसेच निवारागृहाचे  कर्मचारीवृंद उपस्थित होते.