पवनी येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक व काँग्रेस कार्यकर्ता मेळावा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

२४ जुलै २०१९

पवनी येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक व काँग्रेस कार्यकर्ता मेळावामनोज चिचघरे,भंडारा/जिल्हा प्रतिनिधी: 

पवनी-  काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणांमुळे देश उभा झाला आहे. राज्यावर पूर्वी दीड लाख कोटीचे कर्ज होते, ते सध्या सहा लाख कोटींवर गेले आहे, जीएसटीमुळे उद्योगपतींचा फायदा झाला तर गरीब शेतकरी, लहान व्यापारी हवालदिल झाले आहेत, अपघात विमा योजनेत प्रवाशांकडून प्रत्येकी एक रुपया घेण्यात येत असून दररोज ६७ लक्ष प्रवाशांकडून तो जमा केला जात आहे, स्वामीनाथ आयोग लागू न करण्याचा निर्णय केंद्र शासनाने केली आहे.
ईव्हीएम विरुद्ध राज्यात रान उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

पवनी येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी आयोजित काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. 
१९७२ साली दुष्काळ पडला होता तेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी त्यांचा सामना केला होता. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी भाजप प्रणित सरकारने नाकारल्या उलट जीएसटी जुलमी कायदा आणला उद्योगपतींना त्यांचा फायदा होत आहे केंद्रीय अंदाजपत्रक गोंधळ मंजूर करुवून घेतला,
यात मनी बील मंजूर करण्यात आले, चर्चा करून दिली नाही पंतप्रधान फसल विमा योजना फसवी असून राज्य सरकारने सुरू केलेली बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेतून दर दिवशी ६७ लाख रुपये एसटी प्रवाशांकडून जमा केली जात आहे. जागतिक बँकेने केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात भारतात गरिबी नाही असा अहवाल दिला आहे. उज्वला गॅस योजना खेड्यापाड्यात यशस्वी झाली नाही उलट त्यामुळे गरीब श्रीमंतांच्या यादीत आले मोदी सरकारने ११ अरब ९८ कोटी रुपये प्रसार व प्रचारावर खर्च केले, पुढील महिन्यात होत असलेली कॉलेजच्या निवडणूका काँग्रेस पक्षाची युवा संघटना लागणार आहे त्याकरिता तयारीची निर्देश माजी खासदार नाना पटोले यांनी दिले. काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांची नियुक्ती पत्र नाना पटोले यांनी दिले. 
व्यासपीठावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विकास भाऊ राऊत, असफाक  भाई पटेल, प्रेमसागर गणवीर हंसाताई खोब्रागडे, अर्चना वैद्य, बंडुजी टेगंरे सभापती, सुभाष आजभले, बाळूभाऊ ठवकर, माणिकराव ब्राह्मणकर, चंदू भाऊ कावळे  ,विजय सावरबांधे, नीलकंठ टेकाम, भगवान नवघरे, प्रकाश जी पचारे, संचालन व आभार  तालुका अध्यक्ष शंकरराव तेलमासरे, यांनी मानले, बैठकीला शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.