पाथरी तालुका मागणीसाठी कडकडीत बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

१२ जुलै २०१९

पाथरी तालुका मागणीसाठी कडकडीत बंदचंद्रपूर/प्रतिनिधी 
सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्याचे विभाजन करून पाथरी तालुक्याच्या मागणीसाठी 12 जून रोजी पाथरी येथे कडकडीत बंद करण्यात आला.

पाथरी परीसरात 52 गाव येत असुन सिंदेवाही व सावली परीसरातील गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकानी जाण्यासाठी  आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे. 
पाथरी हा मध्यभाग व मोठी बाजारपेठ असल्याने सर्व परीसरातील गावे पाथरीला येतात. यामुळे पाथरी तालुक्याच्या मागणीसाठी  गावकरी  एकत्र येवुन गावकऱ्यांनी गावातून मिरवणूक काढली. रॅलीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन रॅली यशस्वी करण्यात आली.  पाथरी तालुक्याची मागणी रेटून धरली.
अड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात बंद पुकारला असुन बंदचे रुपांतर सभेत झाले सभेचे अध्यक्ष एड. पारोमिता गोस्वामी होते. त्या अध्यक्षीय भाषणात सांगीतले की पाथरी वासीयांनी कोणत्याही नेत्यांवर अवलंबुन न राहता आजचा जोष कायम ठेवल्यास पाथरी तालुका होण्यास कुणीच रोकू शकत नाही. तसेच श्रमिक एल्गार या मागणीला कुवतीनुसार प्रयत्न करनार असून शेवटपर्यंत साथ देणार आहे.  
पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल तुम्मे, सचिव मिथुन मेश्राम, श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, महासचिव घनशाम मेश्राम, उषा भोयर (सरपंच मेहा बु)., अनिल मडावी, तुकाराम पा. ठीकरे,  कमलेश वानखेडे, महेश एंकलवार, विजय बांबोडे, राकेश चेनुरवार, मुन्ना रत्नावार, मेघा वालदे, क्रिष्णा उंदिरवाडे, गणेश मगरे, त्रिशुल पेंदोर व समस्त गावकरी सहभागी होते.