नागपुरात DJ बंद करायला गेलेल्या पोलिसावर हल्ला:पाच पोलीस जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

२३ जुलै २०१९

नागपुरात DJ बंद करायला गेलेल्या पोलिसावर हल्ला:पाच पोलीस जखमी

नागपूर/प्रतिनिधी: 

वाढदिवसाच्या पार्टीचा DJ बंद करायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.महल नजीक असलेल्या नाईक रोडवर रात्री ११ वाजतापर्यंत डीजे सुरू असल्याने एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाकडे तक्रार केली. कक्षाने कोतवाली पोलिसांना नाईक रोडवर जाण्यास सांगितले. पोलिस शिपाई दिनेश भागवत गजभिये हे तेथे गेले. त्यांनी साहिलला डीजे बंद करण्यास सांगितले असता उपस्थित युवकांनी पोलिसांना धक्काबुक्की व दगडफेक केली.या नंतर वातावरण चिघडत गेले. यात पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. 
पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ला करणे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून एका हल्लेखोराला अटक केली. 


निखिल प्रकाश मडावी (वय २७, रा. तेलीपुरा, सिरसपेठ) असे अटकेतील हल्लेखोराचे नाव आहे. सूत्रधार साहिल भोसले (वय २०), हिमांशू भोसले व त्याचे २२ साथीदार फरार आहेत. 
  या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला कळताच पोलिस उपनिरीक्षक ए. एस. टोपले यांच्यासह पोलिसांचा ताफा  व  अतिरिक्त ताफा पोहोचताच हल्लेखोर पसार झाले. मात्र, पोलिसांनी निखिल याला पकडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हिमांशू, साहिल व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे.