ते तासभर लिफ्टमध्ये अडकले; अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

ते तासभर लिफ्टमध्ये अडकले; अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका




दत्ताञय फडतरे (पुणे )-
मंगळवारी दुपारी बारा वाजता सातारा रस्त्यावरील आदिनाथ शॉपिंग मॉलमधे असणाऱ्या लिफ्टमधे एक रुग्ण महिला व चार पुरुष अचानक लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर बंद पडल्याने सुमारे तासभर अडकले होते. यावेळी एक लिफ्टमन ही यांच्यासोबत होता. परंतू, तासाभराचे प्रयत्न सफल होत नाहीत हे लक्षात येताच लिफ्टमधे अडकलेल्या इसमाने अग्निशमन दलाकडे सुटकेची मागणी केली.

अग्निशमन मुख्यालयातील जवान घटनास्थळी लगेचच पोहोचले. लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर मधोमध अडकली असून यामधे एक रुग्ण महिला याच ठिकाणी एक्स-रे काढण्यासाठी आली होती. ते पाच ही जण घाबरलेले होते. जवानांनी त्यांना धीर देत लिफ्ट रुममधे प्रवेश करुन प्रयत्न केले व अवघ्या दहा मिनिटातच सर्व पाच जणांना सुखरुप बाहेर काढले. जवानांनी कर्तव्य बजावत केलेल्या कामाचे त्या पाच ही जणांनी आभार मानले.

या कामगिरीमधे प्र.अ. प्रदिप खेडेकर, वाहन चालक राजू शेलार, जवान छगन मोरे, शफिक सय्यद, मंगेश मिळवणे, रऊफ शेख, राजेश घडशी, विठ्ठल साबळे, दिक्षित, मेनसे, रणपिसे, तारु यांनी सहभाग घेतला.