इरई धरणाचे २ दरवाजे उघडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०२ ऑगस्ट २०१९

इरई धरणाचे २ दरवाजे उघडले

चंद्रपूर/प्रतिनिधी:

राज्यभर सर्वदूर पसरलेल्या पावसाने सलग तीन दिवस चंद्रपूर जिल्ह्यातही दमदार हजेरी लावली.  अश्यातच  चंद्रपुरातील इरई धरणातील ९० टक्के पर्यंत वाढल्याने धरणाचे दोन दरवाजे २५सेंमी नी उघडण्यात आले.आज पर्यंत ५१३ मिमी पावसाचीनोंद करण्यात आली असूनजिल्ह्यातील चारगाव, चदई, लभानसराड या धरणात १००टक्के पाणीसाठा गोळा झाला आहे.

इरई धरण ९०टक्केभरलेले असून ७ पैकी २दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरूआहे, परंतु यामुळे पुरपरिस्थिती निर्माण होणार नाही, अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण अधिकारीजितेश सुरवाडे यांनी दिली आहे.आज पावसाने विश्रांती घेतली आहे.

 असोला मेंढा धरण ८३ टक्के, नरेश्वर धरण ७४ टक्के  भरले आहे. तसेच  जिल्ह्यात आज सरासरी ८ मिमी पाऊस पडलेला असून आता पर्यंत सरासरी ५१३ मिमीपाऊस पडलेला आहे. यामध्ये चंद्रपूर येथे ५०८ मिमी, बल्लारपूर५१९, गोंडपिपरी ४४९, पोंभूर्णा३४४, मूल ५८६, सावली ६६०,वरोरा ५६२, भद्रावती ५१४,चिमूर ५७३, ब्रह्मपुरी ४४१,सिंदेवाही ५५३, नागभीड ४९४,राजुरा ३१०, कोरपना ५६६,जिवती येथे ६१७ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक सावली तालुक्यात पाऊस पडलेला आहे. 

 सध्या इरई नदी लगतच्या गावांना धोका नसून प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.