दुकानात कपडे बदलवत होती तरुणी;अन दुकानदाराकडून छुप्या कॅमेऱ्यातून चित्रीकरण होते सुरु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

१५ ऑगस्ट २०१९

दुकानात कपडे बदलवत होती तरुणी;अन दुकानदाराकडून छुप्या कॅमेऱ्यातून चित्रीकरण होते सुरु

नागपूर पोलीस शहरातील मॉल्स आणि कपड्यांच्या 
दुकानातील चेजिंग रुमची तपासणी करणार

नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर शहरातील बर्डी फ्रेंडस या कापडाच्या दुकानातील चेंजिंग रुममध्ये महिला ग्राहक कपडे चेंज करत असतांना चित्रीकरण करण्यात आल्याचे पुढे आल्याने चांगीच खळबळ उडाली होती,त्या नंतर या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत पोलिसांच्या पथकाने अचानक भेट देत मंगळवारी विविध मॉलसह दुकानातील ट्रायल रुमची तपासणी केलीमॉलसह इतर दुकानातील ट्रायल रुम तपासण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले होते.

मंगळवारी पोलिसांनी सीताबर्डीतील इंटरनिटी मॉल, बिग बाजार, ग्लोबल यासह इतरही लहान मोठ्या कापडाच्या दुकानातील ट्रायल रुमची तपासणी तसेच येथील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यापुढेही आता वेळोवेळी पोलिसांकडून ट्रायल रुमची तपासणी करण्यात येणार आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे आता रेडीमेट कापडाच्या दुकानात केव्हाही पोलीस धाड मारू शकतात. 
पोलिसांनी आता एक विशेष तपास पथक तयार केलं आहे. हे पथक विविध मॉल, शॉप्स आणि अन्य आस्थापनांना आकस्मिक भेट देऊन तेथील चेंजिंग रूमची झडती घेणार आहे. एका मॉलमधल्या महिलांच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल फोन आढळल्याने खळबळ उडाली होती. तरुणींचे अश्लिल व्हिडीओ तयार करण्यात आल्याचंही पोलिसांना आढळून आलं होतं.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध