चंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

चंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून

वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात 
चंद्रपुर/ललित लांजेवार:
वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे.
डयूटी आटोपुन घरी जात असतांना पाणी असलेल्या पुलावरुन गाड़ी टाकली आणि गाडी सोबतच युवक वाहुन गेल्याची घटना चंद्रपूर शहराजवळील भटाळी-दुर्गापूर मार्गावर घडली.सूरज बिपटे असे मृत युवकाचे नाव आहे. मृत युवक भटाळी येथील कोळसा खाणीत कर्मचारी आहे. नुकताच हा युवक खान कर्मचारी म्हणून लागला होता.

मंगळवारी सकाळी शिफ्ट संपल्यावर आपल्या घराकडे येण्यासाठी हा युवक कारने निघाला होता.भटाळी गावाजवळील नदीवरील या पुलाची उंची अतिशय कमी आहे. मागील तीन दिवसांपासून ईरई धरणाचे सातही दरवाजे उघडले कारणाने पाण्याचा प्रवाह या पुलावरून सतत सुरू होता. अशातच या  युवकने वाहत्या पाण्यातून कार टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला.-- या घटनेची माहिती प्रशासनाला होताच शोधमोहीम पथकाने घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरु केली .
अगोदरच प्रशासनाने ईरई धरणाचे सातही दरवाजे खोलण्या पूर्वी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता.बातमी लिहेपर्यंत या युवकाचा शोध सुरूच होता.मिळालेल्या माहिती नुसार हा युवक अजूनही कारमध्येच असल्याचे सांगितले जात आहे.