नागपूर पोलिसातील ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

१५ ऑगस्ट २०१९

नागपूर पोलिसातील ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर



नागपूर/प्रतिनिधी:
 स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसांना राष्ट्रपती पदकजाहीर झाले. तर पाच पोलिसांना विशेष सेवेसाठी आणि 41 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

 विशेष म्हणजे महाराष्ट्रातून राष्ट्रपती पदक मिळविणाऱ्यांमध्ये नागपूर पोलिस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात सध्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेले नितीन शिवलकर, गुन्हे शाखेचे हवालदार अशोक तिडके आणि परिमंडळ तीनमध्ये कार्यरत हवालदार विश्‍वास ठाकरे यांचा समावेश आहे.

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी तिघांचेही अभिनंदन केले आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली. गुनहे शाखेचे एएसआय अशोक तिडके यांनी १३१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.झोन ३ मध्ये कार्यरत एएसआय विश्वास ठाकरे यांनी आतापर्यंत ९३ गुन्हेगारांना तडीपार करून त्यांच्या मुसक्या बांधल्या आहेत.आणि वाहतूक शाखेचे एएसआय नितीन शिवलकर यांना वाहतुकीच्या योग्य बंदोबस्तासाठी ओळखले जाते. ते डीजी अवॉर्डने सन्मानितसुद्धा झालेले आहेत.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध