चंद्रपुर:पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

चंद्रपुर:पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

प्रवीण लांजेवार/चंद्रपुर:
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील जूना पोडसा येथील एका शेतात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मध्यचांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या जूना पोडसा येथील चनकापुरे नामक शेतकऱ्याचा शेतात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला.

वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. यामुळे काही दिवसापुर्वीच वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. या वाघाच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.